Uncategorized

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्‍यापासून पहिल्‍या 72 तासांत करावयाची कार्यवाहीबाबत आवाहन

नांदेड प्रतिनिधी:-

महाराष्‍ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी भारत निवडणूक आयोगातर्फे राज्‍यात विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम आज घोषित करण्यात आला आहे. नांदेड उत्‍तर व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ निवडणूकीची आदर्श आचारसंहितेच्‍या प्रभावी अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्‍यापासून पहिल्‍या 72 तासांत करावयाची कार्यवाहीबाबत पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वच केंद्र शासनाचे व राज्‍य शासकीय/निमशासकीय कार्यालयातील, विभागातील, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्‍थेतील ठिकाणांवरील, मालमत्‍तेवरील, भुखंड, जागा, इमारती,संरक्षक भिंती, मैदाने, रेल्‍वे स्‍टेशन, बस स्‍थानके, हॉल्‍स, प्रेक्षागृहे,नाट्यगृहे, विमानतळ, शासकीय परिसर, रुग्‍णालये, दवाखाने सार्वजनिक उपक्रमाचे कार्यालये ठिकाणे, येथील तसेच वाहने, रुग्‍णवाहीका, शासकीय वाहने इत्‍यादीवरील राजकीय पक्ष, आजी-माजी राजकीय पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, राजकीय व्‍यक्‍ती इत्‍यादी राजकीय पक्ष, राजकीय पदाधिकारी यांचे उभारलेले, स्‍थापित केलेले, प्रदर्शित केलेले नामफलके, कोनशिला, उद्घाटन फलके, उद्घाटन शिला व इतर तत्‍सम प्रचार साहित्‍य, भित्‍तीपत्रके, बॅनर्स, पोस्‍टर्स, फ्लेक्‍स, कट आऊट्स, डिजीटल, इलेक्‍ट्रॉनिक किंवा कोणत्‍याही स्‍वरुपातील प्रचार साहित्‍य, जाहीराती किंवा इतर कोणत्‍याही स्‍वरुपातील तत्‍सम बाबी निदर्शनास येऊ नये यासाठी त्‍यांचे विरुपण (defacement) करणे, झाकणे, आवेष्‍टीत करणे.

सर्वच केंद्र शासनाचे व राज्‍य शासकीय,स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था यांच्‍या मालकीचे, सार्वजनिक ठिकाणांवरील, मालमत्‍तेवरील, भुखंड, इमारती, जागा, संरक्षक भिंती मैदाने व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणांवरील, रुग्‍णालये, दवाखाने, हॉल्‍स, प्रेक्षागृहे, नाट्यगृहे, परिसर, पुल, उड्डाणपुल, विद्युत खांब, टेलिफोनचे खांब, बस, रेल्‍वे, विमाने, हेलिकॉप्‍टर, सर्व निमशासकीय वाहने, रुग्‍णवाहीका 2 इत्‍यादीवरील राजकीय पक्ष, आजी-माजी राजकीय पदाधिकारी, आजी-माजी आमदार, मा.खासदार, मा.मंत्री महोदय, राजकीय व्‍यक्‍ती इत्‍यादी राजकीय पदाधिकारी यांचे उभारलेले, स्‍थापित केलेले, प्रदर्शित केलेले नामफलके, कोनशिला, उद्घाटन फलके, झेंडे, उद्घाटन शिला व इतर तत्‍सम प्रचार साहित्‍य, जाहीराती निदर्शनास येऊ नये यासाठी त्‍यांचे विरुपण (defacement) करणे, झाकणे, आवेष्‍टीत करणे.

सर्व खासगी ठिकाणांवरील, मालमत्‍तेवरील, भुखंड, घरे, कार्यालये, इमारती, दुकाने, संरक्षक भिंती, आस्‍थापना व सर्वच खाजगी ठिकाणे, रुग्‍णालये, दवाखाने, हॉल्‍स, प्रेक्षागृहे, नाट्यगृहे, सर्व खाजगी वाहने, बस, रेल्‍वे, विमाने, हेलिकॉप्‍टर, रुग्‍णवाहीका इत्‍यादी राजकीय पक्ष, आजी-माजी राजकीय पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, राजकीय व्‍यक्‍ती इत्‍यादी राजकीय पदाधिकारी यांचे उभारलेले, स्‍थापित केलेले, प्रदर्शित केलेले नामफलके, कोनशिला, उद्घाटन फलके, झेंडे, उद्घाटन शिला व इतर तत्‍सम प्रचार साहित्‍य निदर्शनास येऊ नये. यासाठी त्‍यांचे विरुपण (defacement) करणे, झाकणे, आवेष्‍टीत करणे. उपरोक्‍त नमूद कार्यवाही करण्‍यासाठीची वरील प्रमाणे नमूद ठिकाणांची निश्चिती आपले अधिनस्‍थ यंत्रणेमार्फत तात्‍काळ करण्‍यात यावी. तसेच विषयांकीत निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच वरील नमूद प्रमाणे तसेच पत्रात नमूद निर्देशांनुसार आचारसंहिता अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी, असे आवाहन 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे व 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button