सामाजिक

एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: आज पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी NCMC कार्ड अनिवार्य

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क:- ०१ सप्टेंबर २६

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटीसवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एकमहत्त्वाचा निर्णय घेतला असून सप्टेंबर २०२६ पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी ‘NCMC कार्ड‘ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डअनिवार्य करण्यात आले आहेयासंदर्भातील अधिकृत परिपत्रक एसटी महामंडळाच्या वाहतूक खात्याने ३१ ऑगस्ट २०२६रोजी जारी केले आहेया नव्या नियमानुसारज्येष्ठ नागरिक आणि महिला लाभार्थ्यांना एसटी प्रवासातील सवलतीचे तिकीट आता केवळ NCMC कार्डद्वारेच दिले जाणार आहेसध्या ‘अमृत ज्येष्ठनागरिक‘, ‘ज्येष्ठ नागरिक‘ आणि ‘महिला‘ प्रवाशांसाठी आगारबसस्थानके आणि अधिकृत एजंट्स मार्फत (मेईबिक्स टेक्नॉलॉजीस लिद्वारेया कार्डची नोंदणी  वाटपाचे काम सुरू असूनभविष्यात टप्प्याटप्प्याने इतर सर्व सवलतधारक प्रवाशांसाठीही हे कार्ड सक्तीचे केले जाणार आहेप्रवाशांच्या सोयीसाठी या कार्डमध्ये पैसे भरण्याची सुविधा थेट एसटीच्या वाहकांकडे (कंडक्टरउपलब्धकरून देण्यात आली आहेमहामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूकयांनी राज्यातील सर्व विभागनियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांना या नव्या नियमाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असूनसर्व चालक आणि वाहकांना याबद्दल अवगत करून प्रवाशांना योग्य ती माहिती देण्याच्यासूचना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button