मुखेडमध्ये मानवसेवेचा अनोखा जागर: ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त ६४ जणांनी केले रक्तदान

राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचा स्तुत्य उपक्रम; प्रशासकीय व वैद्यकीय, राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : २८ ऑगस्ट २६
जश्ने ईद–ए–मिलादुन्नबीच्या पवित्र सणाच्या औचित्य साधून मुखेड येथे राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेच्या उदात्त हेतूने आयोजित केलेल्या याशिबिराला नागरिक, युवक आणि रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात तब्बल ६४ जणांनी रक्तदान करत समाजा समोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
या शिबिराचे उद्घाटन हाफिज अब्दुल गफार आणि हाफिज माजिद बागवान यांच्या शुभहस्ते पार पडले.
या समाजपयोगी उपक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी आदमपूरकर, पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड, डॉ. दिलीपराव पुंडे, डॉ. अशोक कौरवार, डॉ. रामराव श्रीरामे, डॉ. श्रीहरी बूडगेमवार, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पो.उप.नि. संदीप यामावार उपस्थित होते.
तसेच, नगराध्यक्ष प्रतिनिधी कृष्णा देबडवार, न.प. गटनेते विनोद आडेपवार, नगरसेवक मैनोद्दीन शेख, नगरसेवक हरून होंनवडजकर, पंडित पाटील बेळीकर, पंकज गायकवाड, श्याम एमेकर, राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे मराठवाडा उपाध्यक्ष ॲड. असलम शेख, सादक तांबोळी, जिल्हाध्यक्ष महेताब शेख, जयप्रकाश कानगुले, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप कामशट्टे, तालुकाध्यक्ष यशवंत बोडके, सचिव ज्ञानेश्वर डोईजड, अहमद बेळीकर, अनिल शिरसे, खाजा धुंदी, आकाश कांबळे, कॉ. विजय लोहबंदे, भाई पांडुरंग लंगेवाड, डॉ. राहुल कांबळे, सुभानी सय्यद, साईनाथ बोईनवाड, भारत सोनकांबळे, बालाजी कोतापल्ले, एस. के. बबलु, अब्दुल सय्यद, गजानन मोरे, योगेश मामिलवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
रक्त संकलनासाठी डॉ शंकराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व रुग्णालय,विष्णुपुरी,नांदेड पथकाने विशेष परिश्रम घेतले. यामध्ये बीटीओ डॉ. धनश्री केंद्रे, समाजसेवा अधीक्षक सुनित अवटे, प्रदर्श चक्रवर्ती चोदंत्ते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विशाल सरसे, सतीश चिंतल, प्रज्वल वानखेडे, मिश्रा पानसरे, नम्रता सोनसळे, हनुमान गाळे आणि कक्ष सेवक बशीर सय्यद यांनी मोलाची भूमिका बजावली.
हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे जिल्हासरचिटणीस बबलू मुल्ला, तालुकाध्यक्ष भाई आसद बल्खी, शहराध्यक्ष गौस मिर्झा, इम्रान अत्तार, जयभीम सोनकांबळे, मिलिंद कांबळे, मोतीपाशा पाळेकर, चांद येवतीकर, रसूल साब जांबळीकर, फारुख पटेल, खाजा सलगरकर, शब्बीर बल्खी यांच्यासह राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या तालुका वशहर कमिटीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.



