Uncategorizedक्राईम

मुखेडच्या दुय्यम निबंधक कार्यालयात होतेय नागरिकांची आर्थिक लुट.

मुखेड / प्रतिनिधी.

    मुखेड येथील दुय्यम निबंध कार्यालयात रजिस्ट्री करीत असताना सर्व सामान्य नागरीकांची मोठी लुट होत असुन रजिस्ट्रीला ज्यादा रक्कम घेतल्या जात आहे.माझी रजीस्ट्री करण्यासाठी कार्यालयाकडुन घेण्यात आलेली ज्यादा रक्कम वापस करण्याची मागणी विश्वनाथ;अरण्ये यांनी दि.२६ डिसेंबर रोजी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. 
  तालुक्यातील गोरगरीब,सर्वसामान्य नागरीक मोठया प्रमाणात रजिस्ट्री करण्यास दुय्यम निबंधक कार्यालयात येत असतात पण येथील काही दलाल दुय्यम  निबंधक अधिका-यालाच हाताशी  धरुन त्यांच्या संगनमताने नागरिकांची मोठी आर्थिक लुट करीत आहेत.रजिस्ट्री करीत असताना पावतीपेक्षा जास्त पैसे आकारुन स्टॅम्प डयुटीच्या नावाखाली मोठा आर्थिक व्यवहार या ठिकाणी चालतो आहे.शासकीय नियम दाखवून त्यात काही चुका आहेत असे भासवून आर्थिक लुट होत आहे.आणि रक्कम दिल्यास सर्व काही व्यवस्थित कामे होत आहेत.याबाबत चौकशी करुन माझी गेलेली ज्यादा रक्कम मला परत करावी व घेणा-यावर निलंबनाची कार्यवाही करावी. अन्यथा मी आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार आहे.याची गांभीर्याने दखल घ्यावी असेही विश्वनाथ अरण्ये यांनी निवेदनात नमूद करून निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 

माझे बक्षिसपत्र असताना मला १० हजार रुपये लागले. यात स्टॅम्प डयुटी ३ हजार २०० व नोंदणी फिस २०० रुपये,दस्त हाताळणी फिस ४०० रुपये लागले असताना विनाकारण माझ्याकडून १० हजार रुपये घेण्यात आले तर मी नियमात आहे का ? असे बोललो असता तुम्ही ग्रामसेवक कडून बयनामा करुन घ्या..! जास्त बोलू नका अशी उध्दट भाषा आम्हाला दुय्यम निबंधक अधिका-याकडून वापरण्यात आली. 
 विश्वनाथ अरण्ये.
हातराळ ता.मुखेड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button