सीबीएससी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करेल : हमीद दौलताबादी

मुखेड प्रतिनिधी:-
मुखेड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील पहिल्या वर्गास अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी नुकतेच तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण टप्पा – १ पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कुल मुलींचे मुखेड येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी हमीद दौलताबादी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना गटशिक्षणाधिकारी हमीद दौलताबादी म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणा नुसार क्रमाने अभ्यासक्रम बदलत आहे. सुधारित अभ्यासक्रम सीबीएससी दर्जाचा असून विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करणारा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा वशाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी सर्व शिक्षकांनी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रशिक्षण प्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजीराव येवतीकर, सहकारी पतपेढीचे संचालक दिलीपराव देवकांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शिवाजी कराळे, शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी बनसोडे, शिक्षण विस्तार अधिकारी यू.पी. चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी नागनाथ द्याडे, केंद्रप्रमुख श्रीपत वाडीकर, मधुकर गायकवाड यांच्याप्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षण यशस्वितेसाठी वरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या प्रशिक्षणात तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पहिल्या वर्गास अध्यापन करणारे २०० पेक्षा जास्त शिक्षक उपस्थित होते. दि. ११ जुन रोजी या प्रशिक्षणाचा समारोप प्रशिक्षण प्रमुख शिवाजीराव येवतीकर, विस्तार अधिकारी वैजनाथ काळे, डॉ. शिवाजी कराळे, यू.पी. चव्हाण, जि.प. हा. मुलींचे मुखेड येथील मुख्याध्यापक दिलीप कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेताब शेख, केंद्रप्रमुख श्रीपतवाडीकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रशिक्षणासाठी सुलभक म्हणून वैजनाथ काळे, बालाजीगरुडकर, शंकरराव कु–हाडे, डॉ. केरबा कांबळे, शरद डावकरे यांनी कार्य केले.



