शैक्षणिक

बोगस शिक्षक भरतीसंदर्भात विशेष चौकशी समिती नेमणार : शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई : ०४ जुलै २५

राज्यात शिक्षक  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्य समावेश करुन वेतन अदाकेले जात असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये निदर्शनास आले आहेया प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेतामुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन अधिवेशन संपल्यानंतर एका महिन्यात आयएएसआयपीएसआणि न्यायव्यवस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष चौकशी समिती नेम ली जाईलतसेच या समितीच्या चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईलअसे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉपंकज भोयरयांनी विधान परिषदेत सांगितलेसदस्य सुधाकर अडबाले यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होताया अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकरएकनाथ खडसेसंदीप जोशीडॉपरिणयफुकेडॉमनीषा कायंदे यांनी सहभाग घेतलाराज्यमंत्री डॉभोयर म्हणालेशिक्षकांची भरती प्रक्रिया हीनियमाप्रमाणेच होतेत्यास शासन नियम ाप्रमाणेच मान्यता देतेतथापि भरतीमध्ये आर्थिक व्यवहारहोऊन नियमबाह्य भरती झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर निश्चित कारवाई केली जाईलतसेच असेप्रकरण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी प्रलंबित ठेवले असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर देखीलकारवाई करण्यात येईल असेही त्यांनी याबाबतच्या उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button