आरोग्य

मुलीचा प्राण वाचविणाऱ्या देवदूताचा सत्कार..

मुखेड / प्रतिनिधी.

   नायगाव तालुक्यातील गडगा येथील १२ वर्षाच्या मेघा नागनाथ स्वामी हिला पहाटे झोपेत विषारी सापानेदंश केला होता.त्यामुळे मेघाला मुखेड येथील प्रसिद्ध सर्पदंश चिकित्सक डॉ.दिलीपराव पुंडे यांच्या रुग्णालयात दाखल केले होते.डॉ.पुंडे यांनी शर्थीचे प्रयत्न करून तिला मृत्यूच्या दाढेतून वाचविले असुन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मेघाला रुग्णालयातून सुटी देवुन जिवनदान दिले आहे त्यामुळे स्वामी परिवार व गावकऱ्याच्या वतीने देवदूत डॉ.पुंडे यांचा सत्कार करण्यात आला

    गडगा येथील रहिवाशी असलेली मेघा स्वामी ही २७ मार्च रोजी पहाटे दोनच्या सुमारास आपल्या घरात झोपली असता ०५ फुटाच्या विषारी सापाने डाव्या हाताला दंश केला होता.तिला ताबडतोब मुखेड येथील डॉ.पुंडे रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.दुसऱ्या दिवशी मेघाला शुद्धीवर आली त्यानंतर दोनच दिवसांत मेघाला रुग्णालयातुन सुटी देण्यात आली तिच्यावर जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य मुखेड भुषण डॉदिलीपराव पुंडे,डॉ.नितीन अंबेकर,डॉ.मुकुंद गोपूलवाडयांनी उपचार केले.पुंडे  त्यांच्या सहकार्याच्या अथक परिश्रमामुळे  मेघाला मृत्यूच्या दाढेतुन बाहेर काढून तिला जिवनदान दिले.त्यामुळे डॉक्टरांच्या या कार्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button