कार-दुचाकीच्या भीषण अपघातात दोनजण गंभीर जखमी.

▫️पायाचे हाड तुटून कारच्या बोनेट मध्ये
▫️जखमींची प्रकृती चिंताजनक
मुखेड / प्रतिनिधी. २८ जून २५
मुखेड–नरसी राज्य महार्गावरील बजरंगनगर शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाच्याजवळ एका दुचाकी वकारचा भिषण अपघात झाल्यामुळे दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि.२८ जुनरोजी अंदाजे १० वाजताच्या दरम्यान घडली आहे.गंभीर जखमी झालेले दोघे जांभळी व तांदळी येथीलरहिवाशी आहेत.
सविस्तर वृत असे की मुखेड तालुक्यातील तांदळी येथील बालाजी गणपती गायकवाड व मारोती भुजंगजाभंळीकर राहणार जाभंळी हे दोघे दुचाकी क्रमांक एम.एच.२६ सीसी ६५२९ या दुचाकीवरुन मिस्त्री बांधकामासाठी रातोळी–टाकळी येथे जात होते तेव्हां मुखेड शहरालगत असलेल्या गरुडकर पेट्रोल पंपाजवळ मुखेड–नरसी राज्य महामार्गावरुन मुखेडकडे येणाऱ्या हुंदाई ग्रँन्ड आयटेन कार क्रमांक एमएच २९ए.एम.०४४८ या कारचा व दुचाकीचा समोरासमोर धडक होवुन भिषण अपघात झाल्यामुळे याअपघातात दुचाकीवरील बालाजी गणपती गायकवाड वय ४३ वर्ष रा.तांदळी व मारोती भुजंग जाभंळीकरवय ३२ वर्ष राहणार जाभंळी हे दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.अपघातात जखमीझालेल्या बालाजी यांचे दोन्ही पाय फॅक्चर झाले असुन डोक्याला जब्बर जखम झाली आहे.त्यांच्या सोबत असलेले मारोती यांच्याही डोक्याला जखम झाली असुन उजव्या पायाच्या मांडीला फॅक्चर झाले असल्यामुळे दोघेही गंभीर झाले आहे या दोन्ही जखमीवर मुखेड येथील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीयअधिकारी डाॅ.झाडे व त्यांच्या टीमने प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढिल उपचारासाठी नांदेड येथे पाठवले.

अपघातातील चारचाकी वाहनाच्या चालकानी व त्यांच्या बाजूस बसलेल्यांनी सीटबेल्ट लावलेला होता आणी एयरबॅग असल्यामुळे त्यांना कुठलीही दुखा:पत झाली नसल्याचे घटनास्थळी सांगण्यात आले.या घटनेची माहिती मुखेड पोलिसांना मिळताच पोलिस कर्मचारी मनमंथ गौंड ,मधुकर गोन्टे ,चालक भास्कर मुंडे घटनास्थळी भेट देवून जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय मुखेड येथे पाठवले. वृतलिहिपर्यंत मुखेड पोलिसात सदर घटनेसंदर्भात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.



