Uncategorized

दूल्हेशाह रहमान नगर येथे बॅक वॉटरच्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू

नांदेड प्रतिनिधी:- दि. २४ सप्टेंबर 

 गोदावरी पात्रात पाणी सोडण्याने शहरातील अनेक भागात बॅक वॉटर शिरले असून अनेक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहेत्याचवेळी शहरातील दूल्हेशाह रहमान नगर येथे शेख मिन्हाज शेख साजिद वय १६ वर्षीय युवकाचा या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहेस्थानिक नागरिकांनी या युवकाचा बाहेर काढलाया घटनेने एकच खळबळ उडाली आहे

विष्णूपुरी प्रकल्पातून सध्या अडीच हजार क्युसेस वेगाने गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येत आहेपरिणामी गोदावरी नदी पात्राबाहेर आली असून शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरले आहेवसरणी येथील पंचवटीनगरजुन्या नांदेडातील काला पूलगौतम नगर खडकपुरादूल्हेशहा रहमान नगर आदी भागात मोठ्या प्रमाणात बॅक वॉटर शिरले आहेयाच बॅक वॉटरमध्ये बुधवारी सकाळी शेख मिन्हाज शेख साजिद वय १६ वर्षे हा युवक पाण्यामध्ये बुडालातो बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्याचा मृतदेह पाण्या बाहेर काढलाया घटनेने एकच खळबळ उडाली आहेशहरात महापालिकेकडून मंगळवारी सायंकाळ पासून खबरदारीचा इशारा देण्यात आला होतागोदावरी नदीचे पाणी शहरातील सखल भागात येणार आहेनागरिकांनी खबरदारी घ्यावी याबाबत माहितीही देण्यात आली होतीमात्र बुधवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडलीगोदावरी जीव रक्षक दलातील सैय्यद नूर, सैय्यद इक्बाल, शेख लतीफ आणि सैय्यद विकार यांनी बॉडी बाहेर काढली .मात्र त्या युवकाचा मृत्यू झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button