
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड:- २६ ऑगस्ट २६
पवित्र सण ईद–ए–मिलादुन्न्बी म्हणजेच अंतिम पैगंबर हजरत मोहम्मद स.अ यांच्या जन्माचा पवित्र दिवस आहे. या सणाच्या औचित्य साधून सामाजिक बांधिलकी व मानवसेवेच्या उदात्त हेतूने राष्ट्रीय अल्पसंख्यक परिषद मुखेड यांच्या वतीने आज, बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी एका भव्यरक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर पार पडणार असून, जास्तीत जास्त रक्त संकलन करूनगरजू रुग्णांना मदत करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान‘ मानून नागरिकांनी या जीवनदायी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन मुखेड–कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. तुषार राठोडयांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, मुखेडचे तहसीलदार शंकर लाड आणि मुखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. विजया धोंडुराम देबडवार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. प्रशासना सोबतच वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांचाही या उपक्रमाला मोठा पाठिंबा मिळाला आहे.
याप्रसंगी प्रशासकीय व वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुखेडचे गटविकास अधिकारी शिवाजीराव ढवळे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी आदमपूरकर, जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य डॉ. दिलीपराव पुंडे, पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरण डाके आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांचा समावेश आहे. तसेच, आरएएमए संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक कौरवार, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. श्रीहरी बुडगेमवार, वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. रामराव श्रीरामे आणि मुखेड तालुका पत्रकारसंघाचे अध्यक्ष प्रा. यशवंतराव बोडके आदी मान्यवरही याप्रसंगी आपली उपस्थिती दर्शवणार आहेत.
याशिवाय हाफिज अब्दुल गफ्फार कुरेशी, हाफिज माजीद कोंडाजी बानबान, राष्ट्रीय अल्पसंख्यक परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष अब्दुल माजिद बशीर आणि नांदेडचे जिल्हाध्यक्ष मेहताब शेख हे देखील याप्रसंगी उपस्थित राहून या उपक्रमाला प्रोत्साहन देणार आहेत. “तुमच्या एका थेंबाने कुणाचातरी जीववाचू शकतो” या भावनेतून आयोजित या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा सरचिटणीस बबलू मुल्ला, तालुका अध्यक्ष आसद बल्खी आणि गौस मिर्झा,युवा तालुकाद्यक्ष इमरान अत्तार यांच्याशी संपर्क साधावा, अशी विनंती आयोजक राष्ट्रीय अल्पसंख्यक परिषद, मुखेड शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.



