क्राईम

सावरगाव पी.रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार , एक जखमी

मुखेड प्रतिनिधी:- 

शहरातील वासुदेव गल्लीतील रहिवासी असलेले दोन युवकांच्या मोटारसायकलला सावरगाव पीपरिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात होवून यातील एकजण जागीच ठार झाला आहे तर एक जण किरकोळजखमी झाला आहे.

दि.२३ फेब्रुवारी रोजी  वासुदेव गल्लीतील रहिवासी नागेश कुमार कुंभारकर (४०आणि माधव धुमाळ (३०हे दोघेजण मोटारसायकल क्रमांक एमएच२२ .आर८७४५ वर अहमदपूरहुन नातलगाचे अंत्यसंस्कारकरुन मुखेडकडे येत होतेसदर मोटारसायकलला सावरगाव (पी) परिसरात अपघात झालाया अपघातातनागेश कुमार कुंभारकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर माधव धुमाळ हे किरकोळ जखमी झाले आहेतनागेश कुंभारकर यांना जखमी अवस्थेत मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृतघोषित केलेअपघात नेमका कसा झाला याबाबत काहीही माहिती कळू शकली नाहीया प्रकरणी वृत्तलिहीपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये कुठल्याही गुन्ह्याची नोंद झाली नव्हतीदरम्यान तालुक्यात फेब्रुवारीमहिन्यात ११ अपघात झाले असून  ते  व्यक्तींनी मोटारसायकल अपघातात आपला जीव गमावला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button