Uncategorized

एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आपलं आयुष्य संपवलं.

◆ नांदेड पोलिस दलात खळबळ उडवणारी घटना

नांदेड: ड्युटी संपवून गावाकडे परत जात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना ही बुधवारी रात्री घडली उस्माननगर ते कलंबर रोडवरील पत्राच्या एका शेडमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचा मृतदेह आढळून आला. हनुवटीतून मारलेली गोळी थेट कवटीच्या बाहेर निघाली होती. गोविंद मुंडे असं आत्महत्या करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मात्र, आत्महत्येचं कारण अद्यापही स्पष्ट झालेला नाही .

मृतक गोविंद मुंडे हे मूळ राहणारे पिंपळाची वाडी तालुका कंधार येथील आहेत आणि त्यांचे आजोळ वर्ताळा ता. मुखेड येथे आहे. नांदेड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर रुतुराज जाधव यांच्याकडे ते अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. बुधवारी रात्री ड्युटी संपल्यानंतर गोविंद मुंडे हे आपल्या दुचाकीने गावाकडे जात होते. उस्माननगर ते कलंबर मार्गे जात असताना पत्राच्या एका शेडजवळ ते थांबले. त्यानंतर त्यांनी आपल्या जवळील सर्व्हिस रिवॉल्व्हर हनुवटीला लावून गोळी झाडली, अशी प्राथमिक माहिती आहे. हनुवटीतून मारलेली गोळी कवटीच्या आरपार झाली होती. या घटनेनंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button