मस्साजोग प्रकरणाचा तपास करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी

मुखेड : बिड जिल्हतील मस्साजोग तालुका केज येथील सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची क्रुर हत्याकरण्यात आली आहे या गंभीर घटनेचा तपास विशेष यंत्रणेद्वारे करुन जो कोणी या प्रकरणाचामास्टरमाईंड, दोषी असेल त्याचा लवकर शोध घेऊन त्याला कठोरातील कठोर शिक्षा देऊन सरपंच संतोषदेशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्र भर आंदोलन करण्यात येईल अशी मागणी राजमुद्रासामाजिक संघटना व अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने दिनांक १६ डिसेंबर रोजी तहसीलदारयांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. निवेदन सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांच्यावतीने मुखेड तहसिल कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी राजमुद्रा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सचिनपाटील इंगोले, अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील केरुरकर, महाराष्ट्र ग्राहकपंचायत संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावकार बच्चेवार, राजमुद्राचे बालाजी वडजे मसलगेकर, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम सुडके येवतीकर, प्रितम गवाले बावलगावकर, नरेश पाटील इंगोले, योगेशपाटील जाधव, विरभद्र स्वामी केरुरकर, कपिल काठेवाडे, श्रीनिवास पाटील पाळेकर सह आदिंची उपस्थितीहोती.



