बांधकाम कामगाराचा अपघातात मृत्यू; दिवसेंदिवस अपघातात वाढ

मुखेड प्रतिनिधी:-
तालुक्यातील बेरळी खुर्द येथील नितीन ज्ञानोबा बेळीकर (३४) हा खैरका येतील बांधकामावरूनमुखेड येथे येऊन कामगारांना जेवन घेऊन जात असताना रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना १७फेब्रुवारी रोजी अंदाजे दुपारी ३.३० वाजता घडली. तालुक्यातील बेरळी खुर्द येथील कामगार नितीन बेळीकरहा खैरका येथील कामावरून मुखेडकडे मोटारसायकलने कामगारांना जेवण घेऊन येण्यासाठी मुखेड येथेआले व जेवण घेऊन कामावर जात असताना शहराजवळील गरुडकर यांच्या कागद कारख्याजवळ त्यांचाअपघात झाला. यात नितीनला जब्बर मार लागला. दरम्यान नितीन हा जाग्यावरच बराच वेळ तडफडला पणरस्त्यावर रहदारी कमी असल्याने त्यांना दवाखान्यात आणण्यासाठी विलंब झाला. त्यामुळे त्याचा जागेवरचमृत्यू झाला. नितीन बेळीकर यास उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. उमाकांतगायकवाड यांनी मृत घोषित केले आहे.
याबद्दल पोलिस जमादार बालाजी तेलंग यांनी पोलिस पंचनामा केला आहे. दुचाकी वाहनास दुसऱ्या अज्ञातवाहनाने धडक मारली की दुचाकी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला असा प्रश्न निर्माणझाला आहे.



