श्रमिक एकता न्यूज इफेक्ट एक लाखांचा गांजा जप्त तस्करांचे धाबे दणाणले

चक्क महिलेकडे सापडला तब्बल ४ किलो ३८ ग्रॅम गांजा
मुखेड प्रतिनिधी:-
शहरात व ग्रामीण भागात गांजाची विक्री होत असल्याची बातमी श्रमिक एकता न्यूज पोर्टल वर दि ५ मार्च रोजी प्रकाशित करण्यात आली होती
बातमी प्रकाशित होताच पोलिस प्रशासनाच्या वतीने कार्यवाहीस सुरुवात करण्यात आली.
शहरातील वाल्मीक नगरातील एका महिलेकडे ४ किलो ३८ ग्रॅम गांजा आढळून आला. सहायक पोलिसनिरीक्षक अनुपमा केंद्रे यांनी पथकासह ५ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता धडक कारवाई करून महिलेवर गुन्हादाखल करण्यात आला.
शहरातील बसस्थानक परिसरालगत असलेल्या वस्तीत गांजा विक्री सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
चंद्रकलाबाई चौडेकर (वय ७०) ही महिला आपल्या घरात गांजा विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी शनिवारी धाड टाकून १ लाख ९५० रुपयांचा ४ किलो ३८ ग्रॅम गांजा जप्त केला.
या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पोलिस उपनिरीक्षक मंचक फड हे करीत आहेत. याकारवाईत पोलिस उपनिरीक्षक मंचक फड, प्रदीप शिंदे, मधुकर गोन्टे, मारोती मेकलेवाड, योगेश्वर कोकणे, धोंडगे, यादव इबितदार सहभागी होते.
श्रमिक एकता न्यूज इफेक्ट मुळे गांजा तस्करांचे धाबे दणाणले आहे



