क्राईम

मुखेड तालुक्यात अवैध गौण खनिजाचा बोलबाला;तहसीलदारांचा याकडे कानाडोळा 

मुखेड प्रतिनिधी:- दि ०८ एप्रिल २५

मुखेड शहरातून गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शासनाचे ठेके बंद असताना काळी रेती  लालरेती व विना नंबरच्या हायवा टिप्पर मध्ये क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात भरून वाहतूक होत असतानाच्या प्रशासनाकडे वारंवार सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांच्याकडून तक्रारी करण्यात येत होत्या तरी देखील तहसीलदारांनी कारवाई करत नसल्याने अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे मनोबल उंचावले त्याच बरोबर शहराच्या चारी बाजूला मुखेड ते कौठा रोडवर  मुखेड ते शिरूर ताजबंद रोडवर तसेच मुखेड ते हिप्पटरोडवर त्याचबरोबर मुखेड ते नरसी रोडवर खरब खंडगाव येथे अवैधरित्या दगड कटिंगच्या आरामशीन निर्माण झाल्या असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गौण खनिज साठवण केल्याचे दिसून येते याबाबत तहसील कार्यालय मुखेड यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी करून देखील मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांनी कसल्याच प्रकारची कारवाई करीत नसल्याने शहरातील अवैधरित्या गौण खणीजचा व्यवसाय करणारे व्यवसाय हे प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवीत आहेत या सर्व प्रकरणाला जबाबदार महसूल प्रशासन आहे नुकतीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः अवैध वाहतूक यावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहे बावनकुळे यांनी आदेशित केल्या प्रमाणे मुखेडचे तहसीलदार हे अवैध गौन खनिज वाहतुकीवर कार्यवाही करणार का?  मुखेडच्या चारी बाजूला अवैधरित्या गौण खणीजचा व्यवसाय करणाऱ्या आरामशीन वर कारवाई करतील का यावर कानाडोळा  करण्याचे कारण काय याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button