क्राईम

मुखेड नपा ट्रॅक्टरच्या अपघात प्रकरणात १ वर्ष पूर्ण होऊनही तपास प्रलंबित; न्यायासाठी वारसांचा लढा

मुखेड प्रतिनिधी :-

 मुखेड नगरपरिषदेच्या ट्रॅक्टरने झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या राबीयाबी अहेमद बल्खी (वय ८०यांच्या वारसाला नुकसान भरपाई मिळावी आणि तपासात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावीअशी मागणी पोलीस अधिक्षकनांदेड यांच्याकडे अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

२१ जानेवारी २०२४ रोजी मुखेड नगरपरिषदेच्या ट्रॅक्टरने निष्काळजीपणे वाहतूक करत वृद्ध महिलेस जोरातधडक दिलीया अपघातात गंभीर जखमी झालेल्या बल्खी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालामात्रयाप्रकरणात मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करण्यात आलीपी.एस.ओ राठोड यांनीमनमर्जीप्रमाणे गुन्हा दाखल केल्याचा आरोप असूनअद्यापही संबंधित ट्रॅक्टर आणि चालकाचा शोधलागलेला नाही.

अर्जदार असद इब्राहीम बल्खी यांनी दिलेल्या तक्रारीनुसारमुखेड पोलीस ठाण्यातील तपास अधिकारीजाणूनबुजून प्रकरण दाबून ठेवत आहेतत्यांनी नगरपरिषदेच्या ट्रॅक्टरविषयी स्मरणपत्र पाठविल्याचेसांगितलेमात्र अद्याप कोणताही ठोस तपास झालेला नाही.

मोटार अपघात अधिनियम २०२३ नुसारअपघातानंतर  महिन्यांच्या आत नुकसान भरपाईसाठी अर्जदाखल होणे आवश्यक असतेमात्रया प्रकरणाला आता  वर्ष पूर्ण होऊनही तपास प्रलंबित आहेत्यामुळेमृत महिलेच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळण्यास मोठा विलंब होत आहे.

तपास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करूनतातडीने मोटार अपघात प्राधिकरण  जिल्हान्यायालयमुखेड येथे अर्ज दाखल करण्याचे आदेश द्यावेतअशी मागणी पोलीस अधिक्षकांकडे करण्यातआली आहेतसेचया प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावीअशीहीमागणी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button