सामाजिक

९ ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा: मुखेडमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: २७ जुलै २६

अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध दर्शवण्यासाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी नांदेड येथे एका विशाल ‘महामोर्चा‘चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने दि २६ जुलै रोजी मुखेड येथील शासकीय विश्रामगृहात आंबेडकरी समुदायाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीचे आयोजन रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे, भीम शक्तीचे तालुकाध्यक्ष आकाश कांबळे बेळीकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अविनाश कांबळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी इंजि. भीमराव धनजकर हे होते.

यावेळी नांदेड येथून आलेले प्रमुख मार्गदर्शक प्रा. राजू सोनसळे, इंजि. अशोक गायकवाड, राहुल चिखलीकर, नांदेड मनपाचे नगरसेवक कुलदीप राक्षसमारे, अतिश ढगे, मातंग समाजाचे नेते केशव कांबळे आणि संकेत सोनकांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मान्यवरांनी उपवर्गीकरणाच्या निर्णयाबाबत सविस्तर माहिती देत, आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी ९ ऑगस्ट रोजी नांदेड येथे होणाऱ्या महामोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाददेत, मुखेड तालुक्यातून हजारो भीमसैनिक व समाजबांधव या मोर्चात सहभागी होणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या महत्त्वपूर्ण बैठकीला या बैठकीचे अध्यक्ष इंजि.भीमराव धनजकर,तर प्रमुख मार्गदर्शक – प्रा.राजूसोनसळे, इंजि.अशोक गायकवाड,राहुल चिखलीकर,कुलदीप राक्षसमारे (नगरसेवक म.न.पानांदेड),अतिश ढगे, केशव कांबळे (मातंग समाज नेते,नांदेड) संकेत सोनकांबळे, अनिल सिरसे (जिल्हाध्यक्ष,रिपब्लिकन सेना नांदेड), आकाश कांबळे बेळीकर, (भीमशक्ती तालुकाध्यक्ष मुखेड) गंगाधर सोंडारे(जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासभा), इंजि.राजेंद्र वाघमारे,अविनाश कांबळे (तालुकाध्यक्ष भारतीयबौद्ध महासभा,मुखेड), तुकाराम गायकवाड (वंचित बहुजन आघाडीचे नेते, जांब), पवन कांबळे येवतीकर(जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नांदेड),जयभीम सोनकांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्ष),विजय लोहबंदे (राज्य उपाध्यक्ष एस एफ आय),डॉ.राहुल सोनकांबळे (पशुचिकित्सक संघटना राज्यअध्यक्ष),आशिष भारदे (आझाद समाज पार्टी),दिलीप भद्रे (जिल्हा सचिव रिपब्लिकन सेना नांदेड),सिद्धार्थ कांबळेबेळीकर (उपसरपंच प्र.तथा युवा व्याख्याते),सतीश कांबळे बावलगावकर, अण्णासाहेब जाहिरे (होलार समाज नेते),गजानन जमदाडे (चर्मकार समाज नेते), देविदास वाघमारे(मातंग समाज कार्यकर्ते),केतन भेदेकर (वंचित बहुजन आघाडी महासचिव मुखेड),प्रा.अरविंद येवतीकर,आशितोष कांबळे,राजूवाघमारे,अनिल बनसोडे,नागसेन लोहाळे,अतिराज कांबळे,बालाजी सोनकांबळे केरुरकर,कमलाकर घोडके (माजी सरपंच बोमनाळी), के.एस.गायकवाड (चांडोळा), ॲड.रणजीत जामखेडकर, संघशिलभद्रे,सचिन गायकवाड (जांब),कुलदीप बनसोडे, सचिन माहेगावकर,ॲड.बालाजी टिकनरे,डॉ.राजकुमार जोंधळे,संघपाल भेंडेगावकर,पप्पू सोनकांबळे,अंकुश वाघमारे, अजित शिनगारपुतळे इत्यादींची यावेळीप्रामुख्याने उपस्थिती होती.

या बैठकीचे सूत्रसंचालन पत्रकार भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button