जाहुर कब्रस्तान मोजणी प्रकरण: वक्फ कमिटीच्या आमरण उपोषणाचा ६ वा दिवस; राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचा आंदोलनाला पाठिंबा

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क, देगलूर: २६ जुलै २०२६
देगलूर: मौजे जाहुर (ता. मुखेड, जि. नांदेड) येथील मुस्लिम कब्रस्तानच्या शासकीय मोजणीतजाणीवपूर्वक अडथळा आणणाऱ्या व्यक्तींवर आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीनेकठोर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी ‘वक्फ संस्था ग्रेव्हयार्ड (कब्रस्तान)’ समितीच्या वतीने देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा ६ वा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी दि २५ जुलै रोजी ‘राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद‘ या सामाजिक संघटनेच्या वतीनेउपोषणस्थळी भेट देण्यात आली.
आंदोलनाच्या पाचव्या दिवशी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सामाजिककार्यकर्त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी अब्दुल बशीर माजिद (मराठवाडा अध्यक्ष)राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद, पत्रकार महेताब शेख(जिल्हाध्यक्ष),कॉम्रेड गौस अली मामू सलगरकर (ज्येष्ठ समाजसेवक),भाई आसद बल्खी(तालुकाध्यक्ष), पत्रकार बबलू मुल्ला,प्रोफेसर जुबेर खान,सादिक भाई तांबोळी,चांद भाई येवतीकर,शेखदाऊद यांच्यासह इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देगलूरचे उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार, जाहुर येथील मुस्लिम कब्रस्तानच्या जागेचीवक्फ बोर्डाकडे रीतसर नोंदणी झालेली आहे. भूमी अभिलेख विभागाकडून या जागेची शासकीय मोजणीसुरू असताना, पोलीस बंदोबस्त व तलाठी उपस्थित असूनही गावातील काही व्यक्तींनी एकत्र येतमोजणीच्या कामात अडथळा निर्माण केला. “या ठिकाणी मुस्लिम समाजाचे कब्रस्तान नाही, आमचीजमीन आहे,” असा दावा त्यांनी केला.

जबाबदार अधिकारी व पोलीस उपस्थित असतानाही शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवरकोणतीही कायदेशीर कारवाई न करता, अधिकारी मोजणी न करताच निघून गेले, असा गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
या बेजबाबदार पणाबद्दल संबंधित भूमी अभिलेख अधिकारी, जाहुरचे तलाठी आणि मोजणीत अडथळा आणणाऱ्या सर्व व्यक्तींची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी वक्फ संस्थेचेअध्यक्ष दिलावर हैदरसाब शेख आणि इतर सदस्यांनी केली आहे.
मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील असा निर्धार व्यक्त करत, “उपोषणस्थळी काही अनुचितप्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील,” असा थेट इशारा प्रशासनाला देण्यातआला आहे. या निवेदनाच्या प्रती नांदेडचे जिल्हाधिकारी, मुखेडचे तहसीलदार आणि देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत.



