शहर

उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दोन दिवसांत २० यशस्वी शस्त्रक्रिया.

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क:- २६ जुलै २६

येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवेने वेग घेतला असून, २४ आणि २५ जुलै या केवळ दोनदिवसांच्या कालावधीत एकूण २० विविध शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. रुग्णालयाच्या या तत्पर सेवेमुळे मुखेड व परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पेतके यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी आदमपूरकर यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली या सर्व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या दोन दिवसांत झालेल्या शस्त्रक्रियांचा सिझेरियन ०२,मोतीबिंदू (डोळे) ०९,कुटुंब कल्याण ०९ शल्यचिकित्सक डॉ. किशन नाईक, डॉ. प्रदीप ठाकरवाड, डॉ. किरण चव्हाण आणि डॉ. शोभा देवकते यांनी या सर्व शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या. उपजिल्हा रुग्णालयाच्या सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या या तत्पर आरोग्य सेवेबद्दल स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button