सामाजिक

पोलीस उपनिरिक्षक हणमंतराव चोंडीकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार.

मुखेड / प्रतिनिधी ३० जून २५

पोलीस उपनिरीक्षक हणमंत मारोतराव चोंडीकर हे नियत वयोमानानुसार पोलिस दलातुन सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा मुखेड तालुक्यातील चोंडी या गावी गजानन पाटील त्यागमपुरे व मुजाहीद चोंडीकर मित्रमंडळाच्या वतीने दि.२८ जुन रोजी सेवापुर्ती गौरव सोहळा या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करुन पोउनी चोंडीकर यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवापुर्ती गौरव सोहळा व सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतीश गोड मोतीवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन देगलुर नगर पालिकेचे माजी नगरसेवक
प्रशांत दसरवार,दीपक संगमकर, उत्तम वाडीकर,पोलीस उपनिरीक्षक मारोती नंदे,माधव पाटील उमाटे,शेरखान पठाण, राजू पाटील उद्रीकर,उपसरपंच राम शिरूरे,माजी सरपंच विनायक पाटील,राम सावकार पबितवार,चेअरमन बालाजी बसापुरे,राम कंधारे,शिवकांत देवकते,प्राध्यापक राजेश अचेगावे,पोलीस पाटील सचिन कांबळे,राजासाब शेख सह चोंडी येथील प्रतिष्ठित नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी,पोलिस उपनिरिक्षक हणमंतराव चोंडीकर यांचे नातेवाईक,गावातील नागरिक व गजानन पाटील त्यांगमपुरे मित्र मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवा चोंडीकर,संगम अचेगावे माधव देवकते,अजय शिवपुजे, यासिन पठाण,मुजाहिद चोंडीकर,रामनाथ देवकते,शुभम देवकते,हणमंत नंदे,नागमोडे चंद्रकांत,मुसा शेख,शबीर शेख, गंगाधर चिटकलवार,दिलीप त्यांगमपुरे,सुलेमान शेख, शिवदास बोडके,नागनाथ चिटकलवार यांच्यासह मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button