सामाजिक

मुखेड तहसील कार्यालया समोर प्रकल्पग्रस्ताचे उपोषण; दप्तर दिरंगाई करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी


श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- ०९ नोव्हेंबर 

लेंडी आंतरराज्य प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आणि वाढीव पुनर्वसन फाईलचे काम जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणाऱ्या मुक्रमाबाद सज्जातील कामचुकार महसूल कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी वळंकी (ता. मुखेड) येथील रहिवासी पवन वीरभद्र कंदरकुंटे यांनी आज (दि. ०९नोव्हेंबर २०२६) मुखेड तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारले आहे.

कंदरकुंटे यांनी यापूर्वी २८ ऑक्टोबरला नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, मुक्रमाबाद सज्जाचे मंडळ अधिकारी माधव पांचाळ, महसूल सहाय्यक गंगागिर गिरी व ऑपरेटर आसिफ शेख हे मुख्यालयी न राहता जाणीवपूर्वक फाईल दाबून ठेवत आहेत, कागदपत्रे गहाळ करत आहेत आणि प्रत्यक्ष गावात न येताच चुकीचे स्थळ पाहणी अहवाल वारंवार दाखल करत आहेत. याप्रकरणी वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही न झाल्याने आणि अनावश्यक १०० रुपयांच्या बॉण्डची सक्ती करून अडवणूक केली जात असल्याने, दप्तर दिरंगाई कायद्यांतर्गत या तिन्ही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली होती. प्रशासनाने दिलेल्या मुदतीत कोणतीही दखल न घेतल्याने, शिक्षणासाठी लागणारे वैध कुटुंब प्रमाणपत्र त्वरित मिळावे आणि प्रलंबित पुनर्वसन फाईलचे काम तत्काळ निकाली काढावे, या प्रमुख मागण्यांसाठी आज हे उपोषण करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button