सामाजिक

काँग्रेसच्या मागणीला यश, आंदोलनाचा इशारा देताच मुखेड आगारात पाच बसेस दाखल

मुखेड प्रतिनिधी :- १५ जून २५
मुखेड आगार हे नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पन्नाचे असूनही नवीन बसेस नव्हते म्हणून काँग्रेस पक्षाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर मुखेड आगारास पाच बसेस चा पहिला टप्पा प्राप्त झाला आहे. काँग्रेसकडून आगार प्रमुखाचे स्वागत करण्यात आले.
मुखेड बस आगार हे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उत्पन्नाचे आगार असूनही जिल्ह्यातील सर्व आगारांना नवीन बसेस देण्यात आले होते. मुखेडला मात्र खिळखिळ्या व डबघाईस आलेल्या बसेसने प्रवास घडत होता. प्रवाशांची गैरसोय पाहून काँग्रेस पक्षाने प्रदेश सचिव श्रावण रॅपणवाड, तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर आणि प्रवासी संघाचे विश्वनाथराव कोलमकर यांच्या नेतृत्वात आगार प्रमुख आणि जिल्हा व्यवस्थापक चंद्रकांत वडस्कर यांना निवेदन देऊन नवीन बसेस न आल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. कार्यकर्ते,नागरिक व प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्याचे लोकनियुक्त खा.प्रा.रवींद्र चव्हाण आणि प्रदेश नेते श्रीरंग बर्गे यांनी जिल्हा व्यवस्थापक चंद्रकांत वडस्कर आणि व्यवस्थापकीय संचालक मुंबई यांना मुखेड आगारास बसेस उपलब्ध करण्याबाबत सांगितले होते. काँग्रेसच्या या प्रयत्नांना अखेर यश येऊन आज मुखेड आगारात नवीन पाच बसेस दाखल झाल्या आहेत. अजून दहा बसेस मिळणार आहेत. यामुळे प्रवाशात आनंद व्यक्त केला जात आहे.
काँग्रेसच्या निवेदनांची आणि खा.प्रा.रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेची दखल घेऊन बसेस उपलब्ध झाल्याबद्दल काँग्रेस, प्रवासी संघ आणि एपीजे अब्दुल कलाम समितीच्या वतीने आगार प्रमुख पवार व कर्मचाऱ्यांचे सत्कार करून अभिनंदन व आभार मानण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. श्रावण रॅपनवाड, कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकरसह एपीजे अब्दुल कलाम समितीचे एस के बबलू, प्रवासी संघाचे सदाशिव चव्हाण, युवक काँग्रेस शहराध्यक्ष जयप्रकाश कानगुले, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष इम्रान पठाण, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष एम आर गोपनर, तंजिम ए इन्साफ चे जिल्हाध्यक्ष रियाज शेख, फिरोज शेख, शेख मुनवर, सुधीर रॅपनवाड, गफार भाई शेख, सतीश रॅपनवार, गौस पठान, सय्यद नाहेद, हनुमंत रॅपनवाड आदींसह राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आणि अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button