शैक्षणिक

मी जिल्हा परिषदेच्या शाळेतलाच विद्यार्थी-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड प्रतिनिधी:- १६ जून २५
आज संपूर्ण जिल्ह्यात सुट्टी संपून शाळा चालू झाली. यावर्षी महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने इयत्ता पहिलीत दाखल होत असलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागतासाठी एका अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शाळा प्रवेशोत्सवा निमित्त जिल्ह्याचे जिल्ह्याधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव येथिल पहिली प्रवेश पात्र विध्यार्थ्यांना आपल्या हस्ते प्रवेश दिला. तसेच जिल्हा परिषद नांदेड च्या मुख्यकार्यकारी अधिकार मेघना कावली यांनी “माझा शाळेचा पहिला दिवस “या नावाची घडीपत्रिका जिल्हाभरातील पात्र विद्यार्थी हे स्वतः हस्तक्षरात भरतील व ते इयत्ता दहावी पूर्ण म्हणजे २०३५ ला उघडून पाहतील. तेव्हा त्यांचे हस्तक्षर, आपले नोंदवलेले मनोगत वाचून एक वेगळा आनंद त्यांना होईल. तत्कालीन शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांची आठवण होईल. हेच विद्यार्थी आपल्या उजव्या हाताचा ठसा शाळेतील मोठ्या भित्तिपत्रकावर घेऊन शिक्षक दर्शनी भागावर लावतील जेणेकरून विद्यार्थी त्या ठशांना पाहून आनंदी होतील व मनात शिक्षणाची आवड निर्माण होईल अशी संकल्पना यामगची आहे. ती मा. जिल्हाधिकारी यांनी मनोगतातून व्यक्त करताना स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हाताचे ठसे स्वतः घेऊन बालकांशी संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येने वाजेगावातील मातापालक उपस्थित होते. ते यांच्याशी संवाद साधताना म्हणाले ,”मी पण जिल्हा परिषद शाळेत शिकलेला विद्यार्थी आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळेत गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच मैदानी खेळ शिकवले गेले पाहिजे. जेजे मुलांना आवडते ते खेळ शाळेत घेतले जावे. शालेय शिक्षण आनंददायी असावे असे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

जिल्हा परिषद वाजेगाव शाळेने “शाळा प्रवेशोत्सव” अतिशय सुंदर पध्दतीने आयोजन करताना लोकप्रतिनिधी ,पत्रकार, पालक यांचा सहभाग घेतला. याबदल मी या विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड, मुख्याध्यापिक फरहत बानो सर्व,शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती यांचे अभिनंदन करतो, असे मनोगतात म्हणाले. या प्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी म्हणाले, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रभारी महिला असून अतिशय सक्षमपणे त्या शाळा चालवताना दिसून येत आहे. या शाळा प्रवेशोत्सवाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी केले. तर सूत्रसंचालन सीमा देवरे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका फरहत बानो यांनी मानले. या प्रसंगी गावचे सरपंच शेख जमील, शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष शेख ताहेरा बेगम जलाल, शमीम सुलताना, मोहमद शकील, मोहम्मद कफिल, भगवान गजभारे, अनिल कोकरे, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रहेमान, सय्यद मुसा, बाळासाहेब सूर्यवंशी, यशवंत हटकर, पत्रकार लतीफ पठाण, सय्यद समदानी यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button