सामाजिक

ऑटोचालक अमन लदाफ यांचा प्रामाणिकपणा; हरवलेला पर्स व मोबाईल केला परत

लोहा / प्रतिनिधी ०८ जुलै २५

सध्याच्या काळात जेथे हलक्याशा संधीचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या वाढते आहेतेथे काही व्यक्ती आपल्या प्रामाणिक पणा आणि इमानदारीने समाजासाठी आदर्श ठरतातअशाच एकातरुण ऑटोचालकाने आपली जबाबदारी सामाजिक आणि नैतिक मूल्यांची जाणीव दाखवत एक स्तुत्यकृती केली आहे.

लोहा शहरात उर्दू शाळेजवळ एका महिलेचा ₹,७०० रोख रक्कम असलेला पर्स आणि ₹२५,०००किंमतीचा मोबाईल फोन ऑटोमध्ये विसरून राहिला होताप्रवास संपल्यानंतर संबंधित महिला घरीगेल्यावरच आपले मौल्यवान सामान हरवल्याचे लक्षात आले.

पर्स  मोबाईल हे कोणत्याही मोहात  पडता ऑटोचालक अमन लदाफ यांना आढळून आले आणित्यांनी कोणताही गाजावाजा  करता थेट संबंधित महिलेच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन ती वस्तू परतकेली.

ही कृती केवळ प्रामाणिकतेचे नव्हेतर माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरलीआहे.

पर्समध्ये रोख रक्कम असल्याने आणि मोबाईल महत्त्वाचा असल्याने कुटुंब अत्यंत चिंतेत होतेपण अमनलदाफ यांच्या या प्रामाणिकपणामुळे त्यांना मोठा दिलासा मिळालात्यांच्या या कार्याचे स्थानिकपातळीवर सर्वत्र कौतुक होत आहे.

अमन लदाफ यांच्यासारख्या तरुणांमुळेच समाजात अजूनही इमानदारी आणि विश्वासाचे मूल्य टिकूनआहेअशा व्यक्तींचे सार्वजनिक पातळीवर गौरव करणे ही काळाची गरज आहेजेणेकरून नव्यापिढीसाठी ही प्रेरणा ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button