उद्या जेष्ठ स्वातंत्र सैनिक डॉ. राजासिंह चौहान यांचे २५ वे पुण्यस्मरण दिन

▫️मुखेड पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते पहिले सभापती होते
मुखेड प्रतिनिधी:- ०८ जुलै २५
मुखेड येथील जेष्ठ स्वातंत्र सेनानी डॉ. राजासिंह हरिसिंह चौहाण यांचे दि. ०९ जुलै २०२५ रोजी २५ वेपुण्यस्मरण दिन साजरा होत आहे. हैद्राबाद मुक्ती संग्रामातील प्रमुख स्वामी रामानंद तीर्थ यांच्या समवेतत्यानी हैद्राबाद येथील निजाम रावटी विरोधात तीव्र लढा छेडला होता. आपल्या इतर सहकार्यासह घरावर तुळशीपत्र ठेवून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी जिवाची बाजी लावून प्राणपणाने लढणारे व्यक्तीमत्व म्हणून चौहाण यांची संबंध मराठवाड्यात ख्याती होती. डॉ. राजासिंह चौहाण यांचा जन्म मुखेड सारख्या डोंगराळ ग्रामीण भागात झाला. जातीने राजपुत असलेले डॉ. चौहाण हे केवळ त्या वेळेसची ७ वी पासहोते. पण त्यांनी आयुर्वेदिक उपचार पध्दती घेतली होती. सर्व लोकांना ते मोफत उपचार करत असत. त्यामुळे ते डॉ. म्हणून प्रसिध्द होते. डॉ. चौहाण हे मुखेड पंचायत समितीचे पहिले सभापती होने. त्यांनी हैद्रावाद मुक्ती संग्रामात भुमिगत राहुन मुखेड, देगलूर, कंधार, बिलोली या तालुक्यात कार्य केले आहे. तसेच आर्य समाजाच्या चळवळीत हिरीरीने भाग घेतला आहे. हैद्राबाद मुक्ती संग्रामाची चळवळ सुरु असतांना मुखेड येथील पाटलांच्या मळ्यात डॉ. चौहाण यांच्या पुढाकाराने शिबीरे आयोजीत करण्यातआले होते.

या शिबीरास मार्गदर्शन करण्यासाठी मुक्तीसंग्राभाचे प्रमुख स्वामी रामानंद तिर्थ उपस्थित होते. त्यांच्या समवेत अन्य स्वातंत्र्य सेनानीही मुखेड येथे आलेले होते. सोलापूरचे छन्नूसिंह चंदेले, मल्लीकार्जुन विभुते यांचा समावेश होता. या वेळेस पोलिसांकडून धरपकड झाल्यानंतर विभुते यांना ११ वर्ष तुरुंगवास झाला होता. डॉ. चौहाण यांना स्वामीजी बंशीलालजी, छन्नूसिंह चंदेले, माधवराव घोसीकर, खुशालराव मोताळे यांच्या समवेत काम केले आहे. सहकार्याच्या मदतीने गावागावात टोळ्या तयार करणे लपून छपून सरहद्दीवरुन हत्यारांची ने आण करणे, शासनाच्या कर्मचाऱ्यांना निजाम शासनाच्या विरुध्द असहंकार करण्यास सांगणे, वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची माहिती जनतेस देणे, सत्याग्रहाकरीता लोकांनातयार करणे अशा अनेक कामगिऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. मुखेड येथील कॅम्पची जबाबदारी डॉ. राजासिंह चौहाण यांच्यावर असल्यामुळे त्यांना प्रशिक्षणाचे काम करावे लागे. त्यांच्या अशाकार्यवायांमुळे पोलिस व रझाकारांनी त्यांच्यावर व त्यांच्या संबंध कुंटूंबावर पकड वारंट काढले होते. त्यावेळ त्यांना आठ ते नऊ महिने कुटूंबा समवेत भूमिगत रहावे लागले. डॉ. चौहाण त्यांच्या सारख्याअनेक स्वातंत्र्य सौनिकांच्या अथक परिश्रमामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्यानंतरही समाजकार्यात हिरीरीने भाग घेणाऱ्यामध्ये डॉ. चौहाण हे नेहमीच अग्रेसर होते. त्यांनी मुखेड सारख्या डोंगराळ व मागासलेल्या भागात दीनदलीत व गोरगरीब मजुर, लमाणी भटक्या जमातीसाठी तन, मन, धनाने कार्य केले आहे. संत तुकडोजी महाराज यांच्या सोबत काम करुन तालुक्यात लोकजागृती अस्पृश्यता निर्मूलन, व्यसनमुक्ती अस्पृश्यता निर्मूलन, व्यसनमुक्ती, हरीजनासाठी मंदीर प्रवेश, सार्वजनीक विहीरीवर पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, हॉटेल प्रवेश इ. सोईसाठी लढा देवून समानता रुजविण्याचे कामही त्यांनी केले आहे. ग्रामीण डोंगराळ भागात. तांड्यावर शैक्षणिक संस्था, आश्रमशाळांची स्थापना करुन विमुक्त व भटक्या जमातींना शिक्षणाची कास धरावयास लावली. मुखेडपंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून काम करतांना काँग्रेसचे कट्टर पुरस्कर्ते असलेल्या डॉ. चौहाणयांनी ग्रामीण व शहरी भागाचा संपर्क व्हावा या उद्देशाने ग्रामीण भागात रस्ते बांधनी, बसची सोय, विजेचीसोय, पाणी पुरवठा आदी प्राथमिक गरजांच्या पुर्ततेसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांनी बिलोली व मुखेड तालुक्यातील यंत्रणेस तातडीने संपर्क साधता यावा यासाठी रातोळी येथे मन्याड नदीवर पुलबांधण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आजही नरसी, बिलोली, नांदेड येथे जाण्यासाठी सर्व लोक या पुलाचावापर करतात.
मुखेड परिसरातील ज्या भूमिगत स्वातंत्र्यसैनिकानी देशासाठी आपले उभे आयुष्य वेचले त्यांना सरकारदरबारी पाठपुरावा करुन पेन्शन व इतर सुविधा मिळवून दिल्या आहेत. मुखेड तालुका हा आंध्रप्रदेशांलगत वसलेला असल्यामुळे येथे चोरट्या दारुची आवक मोठी आहे. या प्रकारास आळा घालण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात दारुबंदी प्रचार कार्याची मोहिम आखून सर्वसामान्य जनतेलांदारुचे दुषपरिणाम सांगत त्यांच्या उधळलेल्या संसाराची घडी बसविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. मुखेड येथे कोर्ट नसल्याने न्याय मागण्यासाठी देगलूर, नांदेड येथे जावे लागते असे ही अडचण ओळखूनत्यांनी मुखेड येथेच न्यायालय व्हावे यासाठी प्रयत्न करुन न्यायालय स्थापण्यात यश मिळवले आहे.
समाजसेवेच्या भावनेतून व सहकार्याच्या उद्देशाने गावगाव भजुर सोसायटी, मच्छीमार सोसायटी, नागरी पतसंस्था, सुतगिरणी, मेंढपाळ, केंद्र तळे इ. साठी पुढाकार घेतला मुखेड शहरात १९६२ पासूनचे नेहरुबसतीगृह सुरु करुन गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी राहण्याची सोय उपलब्ध करुन दिली. मुखेड तालुक्यातील अखील भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन सेना पुणे या संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणून कार्यकरीत असतांना भ्रष्टाचारास आळा घालण्याचे काम केले. त्यांच्या या कामगीरीमुळे १९९८ मध्ये मुंबई महापालिकेचे तात्कालीन आयुक्त गो. रा. खैरनार यांच्या हस्ते पुणे येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन सेना पुणे यांच्या तर्फे देशप्रेमी पुरस्कार बहाल करण्यात आला. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असतांना शेतकऱ्याची व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात होत असलेली पिळवणूक थांबवण्यासाठी कडता. काटा, तोळा कमीशन यासारखे प्रकार बंद केले. खरेदी‘ विक्री संघाच्या अध्यक्षपदी असतांना महाराष्ट्र राज्य बि–बियाणे, खत शेती उपयोगी औषधे योग्य दरात मिश्रुन देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या विविध कार्याची दखल घेऊन शासनाने १४ एप्रील १९९८ रोजी महाडयेथे डॉ. आंबेडकर दलित मित्र पुरस्कार देवून गौरव केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याहस्ते हा पुरस्कार डॉ. राजासिंह चौहाण यांना प्रदान करण्यात आला. या महान स्वातंत्र्य सैनिकाचे ९ जुलै२००० रोजी निधन झाले. अशा या महान स्वातंत्र्य सैनिकास भावपुर्ण श्रध्दाजंली.
