शैक्षणिक

श्री सद्गुरू सेवालाल महाराज कनिष्ठ महाविद्यालयात नीट, जे.ई.ई, एम एच- सि ई टी व विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन वर्गाचे भव्य उद्घाटन संपन्न

मुखेड/प्रतिनिधी:- ०७ जुलै २५

मुखेड तालुक्यातील मौजे सावरगाव पीर येथील श्री सद्गुरू सेवालाल महाराज कनिष्ठ महाविद्यालयात सोमवार दि. ७ जुलै २०२५ रोजी नीट, जे.ई.ई, एम एच- सि ई टी व विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन वर्गाचे भव्य उद्घाटन मुजाहीद साहब (सरपंच ग्रा.पं.सावरगाव.पी),संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माधवराव राठोड, बालाजी बनसोडे केंद्रप्रमुख, सायलू करेवाड केंद्र प्रमुख, डॉ.श्रीहरी बुडगेमवार आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती
डॉ.किरण ठाकरे,डॉ.विजय मुसांडे,एजाझ साहब (उपसरपंच),मनोजभाऊ कांबळे (कंत्राटदार,समाजसेवक),डॉ.दत्ता मुसांडे ,डॉ. नेहा कुंडलवाडे,डॉ.रमाकांत आडे,जाधव सर (मुख्याध्यापक, जि. प. हा. सावरगाव पि.),अभय कर्णावट (मुख्याध्यापक, गंगाबाई प्रा. व मा. शाळा सावरगाव पि.),श्री श्रियोग इटग्याळकर (मुख्याध्यापक),निवासी मूकबधिर विद्यालय सावरगाव पि.) प्रकाश धनाजी राठोड,

प्रा.महेश वंटेकर (झेप कोचिंग क्लासेस मुखेड),अशोक रेड्डी, (विज्ञान शिक्षक, जि. प. हा. सावरगाव पि.) इत्यादींची यावेळी उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्रा.मुखतार पटेल सर हे होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.विशाल सिरसे,सूत्रसंचालन प्रा.प्रकाश राठोड,तर कार्यक्रमाचे आभार प्रा.मुखतार पटेल सर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button