सामाजिक

बेकायदेशीर पणे रस्त्यावर थांबणाऱ्या मुंबई -पुणे ट्रॅव्हल्सचा नागरिक व टिव्हशनसाठी ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास 

मुखेड प्रतिनिधी:- १६ जुलै २५

शहरातून व बाहेर तालुक्यातून मुंबई पुणे खाजगी ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात चालतात हे वाहतुक राष्ट्रीय महामार्ग असलेल्या रस्त्यावर प्रवाशांना घेण्यासाठी तासनतास उभे राहत असल्याने दोन चाकी ,तीन चाकी,शासकीय महामंडळचे बस तसेच नागरिक व टिव्हशन साठी रस्त्यावरून येजा करणारे  विद्यार्थीना बेकायदेशीर रित्या चालणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स वाहतूकीला अडथळा निर्माण होत असून याचा नाहक त्रास जनतेला करावा लागत आहे त्या मुळे महत्व पूर्ण विषयाची संबंधित विभाग व तालुका प्रशासनाने दखल घेऊन नागरिकांची होत असलेली गैर सोय थांबवण्यासाठी मुंबई पुणे ट्रॅव्हल्स थांबण्याचे पॉइंटची व्यवस्था शहराच्या बाहेर करण्यात यावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे 

मुंबई पुणे  ट्रॅव्हलस वाहतुकीच्या विस्कळीत नियोजनामुळे व रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरामुळे वाहनचालकांसाठी डोके दुःखी ठरत आहेट्रॅव्हलस बस चालकांनी संपूर्ण रस्ता ताब्यात घेतल्यामुळे दुचाकी चालक व टिव्हशनसाठी येजा करणारे  विद्यार्थ्यांना नाहक त्रस्त सहन करवा लागत आहे, या वाहतुकी मुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी मुंबई पुणे  ट्रॅव्हलस  वाहतुकीचे मुखेडच्या बाहेर नियोजन करण्याची आवश्यकता असल्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button