धक्कादायक ! २५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

▫️विद्या सुकळे यांनी आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय का घेतला, हे अद्याप गुलदस्त्यात पोलिसांकडून सखोलतपास सुरू
मुखेड/एकलारा १७ जुलै २५
विवाहित तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . विद्या सुशील सुकळे (वय २५) असे तिचे नाव आहे
ही घटना एकलारा गावात सोमवारी (दि. १५ जुलै) सायंकाळी ४ च्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे, पोलीस उपनिरीक्षकमंचक फड आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो उपजिल्हा रुग्णालयात मुखेड येथे पाठवला. तेथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुण वयात अशा प्रकारचा निर्णय का घ्यावा लागला, यावरून अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित होत असून, पुढील तपासानंतरच आत्महत्येचंनेमकं कारण समोर येणार आहे



