आरोग्यशैक्षणिक

जि.प.मुलींचे हायस्कूल गुणवत्तेसह विविध उपक्रम राबविणारी सर्वोत्तम शाळा – डॉ.दिलीप पुंडे.

मुखेड / प्रतिनिधी.

पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड ही गुणवत्तेसह विविध उपक्रम राबविणारी महाराष्ट्रातली सर्वोत्तम शाळा म्हणुन सर्वदूर परिचित आहे.येथे जवळपास १ हजार ६०० विद्यार्थ्यांची संख्या आहे.येथे तुम्ही विविध उपक्रम राबवता ही खुप चांगली बाब आहे.एकीकडे इंग्रजी शाळांकडे ओघ वाढला आहे.इंग्रजीही शिकली पाहिजे पण आपली माय मराठी मातृभाषा दुधाची भाषा विचाराची भाषासुद्धा टिकली पाहीजे या शाळेमध्ये राष्ट्रगीता बरोबरच तुकोबाचे अभंगही मुलांच्या ओठाला तुम्ही चिटकवत आहात आपल्या संस्कृतीचे संवर्धनही होत आहे हे अत्यंत आनंदाची बाब आहे.इथे छोट्या छोट्या बालिका पाहून मला खूप आनंद झाला बापाची लाडकी लेक असते कुठलाही बाप मुलापेक्षा लेकीचा लाड जास्त करतो.शिक्षण म्हणजे  विकासाचा राजमार्ग होय त्यांचे सारथी म्हणजे गुरुजन असतात. विद्यार्थ्यांनो तुम्ही शिकुन खुप मोठे व्हा.शिक्षकांनी आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचे दान विद्यार्थ्यांना करुन त्यांना घडविण्याचे मोठे काम आपल्या हातुन करावे कारण शिक्षकाच्या अकाउंटला किती रुपये आहेत ते महत्त्वाचे नसते तर त्यांनी घडवलेले गुणवान विद्यार्थी हेच त्यांच्या अकाउंटचे बॅलन्स असते  असे प्रतिपादन मुखेडभुषण डाॅ. दिलीपराव पुंडे यांनी जि.प. मुलींचे हायस्कूलमध्ये आयोजीत आरोग्य शिबीर कार्यक्रमात बोलताना केले.
पिएमश्री योजनेतुन आयोजीत करण्यात आलेल्या आरोग्य शिबीराची सुरूवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीताच्या माध्यमातून उपस्थितांचे स्वागत केले.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य डॉ.दिलीप पुंडे हे होते तर उदघाटक म्हणून गटशिक्षण अधिकारी हामिद दौलताबादी., प्रमुख अतिथी आयएमए आरोग्य संस्थेचे अध्यक्ष डॉ.रामराव श्रिरामे,डॉ. एम.जे.इंगोले,शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजीराव येवतीकर,डॉ.शिवाजी कराळे, मुख्याध्यापक डी.जे.कांबळे, दतंरोगतज्ञ डॉ.पांडुरंग श्रिरामे, डॉ.व्ही.टी.शेटवाड,डॉ.प्रशांत खंडागळे,डॉ. सतिश धमणे, डॉ.संदीप ढगे,डॉ.सौ.प्रिया खडांगळे,डॉ.किरण ठाकरे, डॉ.जावेद शेख,डॉ.सुरेखा पेरके, शिक्षक संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष दिपक लोहबंदे,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्षा सौ.उर्मिला गिते,सुनिल तरगुडे, श्रिदेवी पांचाळ,भवानिसींह चौ्हाण,संजय यलमवाड,संजय बिडवई,मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील शौकतअल्ली बेग,शहानवाज शेख,संजयकुमार फुले,किरण पवार,दिनेश राठोड, भगवान पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.शिबिरामध्ये डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर मोफत औषधी देण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरूवातीस मान्यवरांचे ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांने लेझीम पथकाच्या माध्यमातून जोरदार स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सांस्कृतिक विभागप्रमुख दिलीप देवकांबळे व सहशिक्षिका सौ.सुरेखा हराळे यांनी केले तर प्रस्ताविक मुख्याध्यापक डी.जे. कांबळे यांनी केले.उपस्थितांचे आभार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेताब शेख यांनी मानले.यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,सदस्य तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button