Uncategorized
मुखेड महावितरणच्या कार्यालयातून ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पळविले.

मुखेड प्रतिनिधी:- ३१ जुलै २५
नांदेड : मुखेड महावितरणच्या उपविभाग कार्यालयातून अज्ञात चोरट्याने संगणक व खुले पार्ट असाएकूण ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याची घटना घडली आहे
मुखेड येथील मोहनावती ढाबा समोर महावितरण चे उपविभाग कार्यालय आहे. २८ ते २९ जुलै दरम्यान अज्ञात चोरट्याने या कार्यालयाचे मेन गेटचे कुलूप तोडून कार्यालयात प्रवेश केला. त्याने कार्यालयातील संगणक व खुले पार्ट असा एकूण ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार गोटे करीत आहेत.



