सामाजिक

मुखेड नगरपालिकेचा अमानुष कारभार: स्वच्छता कर्मचाऱ्यांना हँडग्लोज ऐवजी हातात प्लास्टिक पिशव्या गुंडाळून कचरा उचलण्याची वेळ!

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: २९ सप्टेंबर २६

शहराला चकाचक ठेवणाऱ्या आणि घाणीचे साम्राज्य उपसून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवाशी मुखेड नगरपालिका थेट खेळ खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियमानुसार नालीचा व रस्त्यावरील दूषित कचरा उचलण्यासाठी कर्मचाऱ्यांना हँडग्लोज, मास्क, सेफ्टी शूज आणि विशिष्ट युनिफॉर्म देणे बंधनकारक असताना मुखेड नगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांना चक्क हातात दुकानातील रिकाम्या प्लास्टिक पिशव्या गुंडाळून कचरा उचलावा लागत असल्याचे संतापजनक वास्तव उघडकीस आले आहे.

नालीतील दुर्गंधीयुक्त गाळ, मानवी विष्ठा, काचा, इंजेक्शनच्या सुया आणि धोकादायक कचरा ट्रॅक्टरमध्ये भरताना महिला कर्मचाऱ्यांच्या हाताला कसलेही अधिकृत सुरक्षा साधन उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. संसर्ग होऊ नये म्हणून स्वतःच्या सुरक्षेसाठी महिला कर्मचाऱ्यांना किराणा वादुकानातील साध्या प्लास्टिक पिशव्या हातावर बांधून काम करावे लागत आहे. हा प्रकार केवळ संतापजनक नसून प्रशासकीय असंवेदन शीलतेचा कळस आहे.

घाणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दरमहा नियमित आरोग्य तपासणी होणे, आवश्यक त्या प्रतिबंधकलशी (डोस) देणे हे पालिकेचे कायदेशीर कर्तव्य आहे. मात्र, मुखेड नगरपालिकेने कर्मचाऱ्यांची कसलीहीनियमित आरोग्य तपासणी केलेली नाही, ना त्यांना टिटॅनससारखे आवश्यक प्रतिबंधक डोस दिले जातआहेत. त्यामुळे या सर्व महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचे आयुष्य गंभीर साथीचे आजार व संसर्गाच्याविळख्यात सापडले आहे.

सुरक्षा साहित्याच्या नावाखाली दरवर्षी लाखो रुपयांचा निधी कागदोपत्री खर्च दाखवला जातो, मगप्रत्यक्ष मैदानात राबणाऱ्या महिलांच्या हातात प्लास्टिक पिशव्या का, असा थेट सवाल आता उपस्थितहोत आहे. संबंधित स्वच्छता ठेकेदार आणि नगरपालिकेचे जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जिवावरउठले आहेत का?

कष्टकरी सफाई कामगारांच्या हक्काचे सुरक्षा साहित्य त्वरित वाटप करून त्यांची संपूर्ण आरोग्यतपासणी तातडीने सुरू करावी; अशी मागणी मुखेडच्या नागरिकांन कडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button