दुष्काळाच्या ‘ट्रिगर-१’ मधून मुखेड, मुदखेड का वगळले? निर्णयातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

▫️१ ऑक्टोबरला तहसीलसमोर लाल बावटा युनियनचे धरणे आंदोलन
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड:- २८ सप्टेंबर २६
राज्य शासनाने खरीप हंगाम २०२६ साठी जाहीर केलेल्या दुष्काळ मूल्यमापनाच्या ‘ट्रिगर–१‘ यादीतून नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि मुदखेड या दोन तालुक्यांना वगळल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या अन्याया विरोधात ‘महाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन (लालबावटा)’ आक्रमक झाली असून, निर्णयाचा फेर आढावा घेऊन आकडेवारी जाहीर न केल्यास १ ऑक्टोबररोजी मुखेड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा युनियनने निवेदनाद्वारे दिला आहे.
शासनाने २५ सप्टेंबर रोजी राज्यातील २५५ तालुक्यांमध्ये ट्रिगर–१ लागू केला असून यात मराठवाड्यातील ७६ पैकी तब्बल ७४ तालुक्यांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी १४ तालुकेया यादीत पात्र ठरले असताना केवळ मुखेड आणि मुदखेडला वगळण्यात आले. ९ सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार मुखेडमध्ये ८८.५३% तर मुदखेडमध्ये ९५.२८% पाऊस झाला होता. दुष्काळमूल्यमापनात केवळ पावसाची आकडेवारी न पाहता पावसातील खंड, जमिनीतील ओलावा, भूजलस्थिती व पिकांचे नुकसान तपासणे बंधनकारक असताना या दोन तालुक्यांना कोणत्या निकषांवर वगळले, असा प्रश्न युनियनने उपस्थित केला आहे.
या संदर्भात युनियनने २४ सप्टेंबरच्या कृषी आयुक्त अहवालातील सांख्यिकी जाहीर करणे, संयुक्तपथकाद्वारे प्रत्यक्ष पीक पाहणी करणे, शेतमजुरांसाठी रोहयो अंतर्गत तातडीने कामे सुरू करणे आणिचारा–पाण्याचा कृती आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने यावर तातडीने फेरविचारन केल्यास १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वाजता तहसीलवर धडक मोर्चा व धरणे आंदोलन करण्यातयेईल. हे निवेदन कॉ. माधव देशटवाड, कॉ. अंकुश अंबुलगेकर, कॉ. लक्ष्मण भोकसखेड आणि कॉ. रावसाहेब यांनी प्रशासनाला सादर केले आहे.



