Uncategorized

मुखेडच्या तहसील कार्यालयात नायब तहसीलदार, अव्वल कारकूनची पदे रिक्त

मुखेड प्रतिनिधी

मुखेड तहसील कार्यालयातील एकूण चार नायब तहसीलदार पैकी ०२ नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेतयामध्येतालुक्यातील गोरगरीब सर्वसामान्य कुंटुबातील जनतेला स्वस्त धान्य दुकानदारांच्या मार्फत धान्य पुरवठा करणारेमहत्वाचे विभाग पुरवठा विभागातील नायब तहसीलदार पद मागील आठ महिन्यांपासून रिक्त आहेतसेच निवडणूकविभागातील नायब तहसीलदार पद  अव्वल कारकून पद सुद्धा रिक्त असल्यामुळे नागरिकांचे कामे खोळंबली आहेतत्यामुळे तहसिल कार्यालयातील रिक्त असलेली पदे तात्काळ भरुन जनतेची होत असलेली गैरसोय थांबवावी अशीमागणी तालुक्यातील सुज्ञ नागरिकांतुन होत आहे 

नुकतच ३१ में रोजी तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार अशोक लबडेअव्वल कारकून गुलाब शेख व इतर तीनअधिकारी  कर्मचारी नियत वयोमानुसार सेवानिवृत्त झाले आहेतत्यामुळे येथील पदे रिक्त झाली आहेतपुरवठाविभागाचा कारभार तर प्रभारी अधिकाऱ्यावरच चालत आहेतहसील कार्यालयात महसूल महसूल निवडणूकपुरवठा अशा चार विभागासाठी ०४ नायब तहसीलदार कार्यरत असतात यामध्ये महसूल विभाग  ला पांडुरंग गंगणर तरमहसूल विभाग  ला नंदकुमार भोसीकर आहेत तसेच पुरवठा विभागास तात्कालीन नायब तहसीलदार विजयकुमारपाटे यांची ऑक्टोबर २०२३ ला बदली झाल्यापासून हे पद प्रभारीवरच आहेमहसूल  चे नायब तहसीलदार पांडुरंगगंगणर यांना पुरवठा विभागाचे अतिरिक्त पदभार देण्यात आले आहेत्यामुळे रिक्त असलेली पदे भरुन नागरिकांचीगैरसोय टाळण्याची मागणी नागरिकांतुन केल्या जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button