सामाजिक

रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटीच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीहरी बुडगेमवार; आज पदग्रहण सोहळा

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: २८ जुलै २६

रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटी’च्या नूतन कार्यकारिणीचा (वर्ष २०२६-२७) पदग्रहण सोहळा आज, मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता मुखेड येथील नगर परिषदेजवळ असलेल्या व्यंकटेश्वरा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. या विशेष सोहळ्यात डॉ. श्रीहरी बुडगेमवार हे अध्यक्षपदाची, तर पवन पोतदार हे सचिवपदाची सूत्रे स्वीकारतील.

हा सोहळा ह.भ.प. श्री. नामदेव महाराज दापकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रो. सतीश लोणीकर, रो. शिवशंकर पाटील आणि रो. प्रा. संजय पाटील हे उपस्थित राहणार आहेत. तसेच, मावळते अध्यक्ष रो. प्रा. डॉ. उमाकांत पद्मावार आणि मावळते सचिव रो. प्रा. डॉ. संजीव रेड्डी यांची विशेष उपस्थिती लाभणार असून त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरीचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.

या पदग्रहण सोहळ्यास रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, सदस्य, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button