सामाजिक

सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प! रोटरी क्लब मुखेड सिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड : २९ जुलै २६

मुखेड येथे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या ‘रोटरी क्लब मुखेड सिटी‘चानवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच शाही थाटात आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात डॉ. श्रीहरी बुडगेमवार यांनी नूतन अध्यक्षपदाची तर पवनपोतदार यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली.

या दिमाखदार सोहळ्याची सुरुवात वृक्षाला पाणी देऊन करण्यात आली, ज्यातून क्लबचापर्यावरणाप्रती असलेला दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली. हरिभक्त पारायण नामदेव महाराज दापकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला.

यावेळी मंचावर डी.जी.एन. सतिष लोणीकर, ए.जी. शिवशंकर पाटील, ए.जी. संजय पाटील, मावळते अध्यक्ष उमाकांत पदमवार, अहमदपूरचे अनिल चवले आणि प्रांतपाल संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी नूतन अध्यक्ष व सचिवांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आगामी काळात विविध लोकोपयोगी उपक्रमराबविण्याचा संकल्प व्यक्त केला. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, पर्यावरण रक्षण, गरजू विद्यार्थ्यांना मदत, तसेच रक्तदान व अवयवदान जनजागृतीवर भर देण्यात येणार असल्याचे स्पष्टकरण्यात आले. समाजातील वंचित घटकांच्या उत्कर्षासाठी रोटरी क्लब अधिक व्यापक स्तरावर काम करेल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

उपस्थित मान्यवरांनी रोटरी क्लबच्या आजवरच्या सामाजिक कार्याचे तोंड भरून कौतुक केले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा सामाजिक संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून, रोटरी क्लब मुखेड सिटीने आगामी काळात अधिक व्यापक स्वरूपात समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.

मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती या शानदार सोहळ्याला मुखेड भूषण सर्पदंश चिकित्सक डॉ. दिलीप पुंडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अशोक कौरवार, डॉ. वीरभद्र हिमगिरे, डॉ. श्रावण रॅपनवाड, डॉ. रामराव श्रीरामे, उद्योजक उमेश गरुडकर, संजय रेड्डी, बस्वराज शिवपुजे, प्रा. संजीव डोईबोळे, चंद्रकांत एकलारे सर, गजानन कवटीकवार, मनोज जाजू, डॉ. स्वप्नजा चांडोळकर, आणि अ‍ॅड. शारदा पाटील आदी मान्यवरउपस्थित होते.

याचबरोबर शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि व्यापारी क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठितव्यक्ती, रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या शाही पदग्रहण सोहळ्याची मुखेड शहरात सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button