माजी प्राचार्य प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांना मातृशोक; वत्सलाबाई बदने यांचे दुःखद निधन

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: २७ जुलै २६
मुखेड तालुक्यातील वसंतनगर येथील ग्रामीण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांच्या मातोश्री वत्सलाबाई दत्तात्रय बदने यांचे आज, सोमवार दि. २७ जुलै २०२६ रोजी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८० वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
वत्सलाबाई या अत्यंत मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा भरगच्च परिवार आहे. त्यांच्या जाण्याने बदने कुटुंबावर दुःखाचाडोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पार्थिवावर उद्या, मंगळवार दि. २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता त्यांचे मूळ गाव मौजे देवकरा (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नातेवाईक आणि हितचिंतकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन बदने परिवाराकडून करण्यात आले आहे.



