मुखेड शहरात “अंगदान जीवन संजीवनी” अभियान अंतर्गत जनजागृती रॅली संपन्न

मुखेड प्रतिनिधी:- ७ ऑगस्ट २५
महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच आयुक्त आरोग्य सेवा, आयुक्तालय मुंबई यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्य भरात ०३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत अंगदान जीवन संजीवनी अभियान राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पेरके,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पावडे,नोडलअधिकारी डॉ. हनुमंत पाटील, व डॉ. बुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषटांकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हा रुग्णालय, मुखेड येथे दि ५ ऑगस्ट रोजी अंगदान जीवन–संजीवनी अभियान अंतर्गत शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली
मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ नुसार ३ ऑगस्ट १९९४ रोजी भारतामध्ये पहिले हृदयप्रत्यारोपण प्रक्रिया पार पडल्यामुळे ३ ऑगस्ट हा दिवस अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो .हाउद्देश समोर ठेवून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मेकेवाड, डॉ. गोपुलवाड, डॉ. शेटवाड, उपस्थित होते. व वरिष्ठलिपीक,माधव तोटावाड , RKSK समुपदेशक शौकत अली बेग व NCD समुपदेशक, शेख शहानवाज,NCD स्टाफ नर्स ,धनुरे शुभदा ,आयसीटीसी समुपदेशक शंकर सोमठाणकर व लॅब टेक्निशियन काशीदमॅडम शंकराव चव्हाण प्राथमिक शाळा मुखेड येथील मुख्याध्यापक शिंदे मॅडम आणि शिक्षक कर्मचारीपवार ,कार्लेकर, गाडेकर , बरबडेकर व अधिकारी, कर्मचारी शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते




