नीट परीक्षेतील गैरव्यवहारा विरोधात सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मुखेड अधिवक्ता संघाचा जाहीर पाठिंबा

(श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड): १९ जुलै २६
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या राष्ट्रीयस्तरावरील प्रवेश परीक्षांमध्ये (NEET-UG) झालेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीच्या निषेधार्थ, नवी दिल्लीतील जंतर–मंतर येथे शिक्षण तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पुकारलेल्या बेमुदत उपोषणाला ‘अधिवक्ता संघ, मुखेड‘ने आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. १७ जुलै २०२६ रोजी झालेल्या अधिवक्ता संघाच्या सर्वसाधारण सभेत या संदर्भातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
सध्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमधील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितता व मानसिक तणाव वाढला आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी जंतर–मंतर येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचा सन्मान करत आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करत, मुखेड अधिवक्ता संघाने (ठराव क्रमांक: २०/२०२६) खालील प्रमुखठराव एकमताने मंजूर केले:
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या शांततापूर्ण बेमुदत उपोषणाला मुखेड अधिवक्ता संघ जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर केंद्र शासनाने तातडीने सकारात्मक संवाद साधून विद्यार्थ्यांच्या हिताचायोग्य तो निर्णय घ्यावा.
राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापितकरण्यासाठी शासनाने तातडीने आवश्यक ती सर्व प्रभावी पावले उचलावीत.
हा ठराव अधिवक्ता संघाच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर केला. यावेळी पत्रावर स्वाक्षरी करणारे अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. एस. जे. गायकवाड, उपाध्यक्ष ॲड. शंकरबादवाड, सचिव ॲड. राहुल मोरे, सहसचिव ॲड. माधव मरकंडवाड आणि कोषाध्यक्ष, यावेळी अभिवक्तासंघाचे ज्येष्ठ विधीज्ञ दिगंबरराव मावलीकर साहेब,अभिवक्ता संघाचे मा.अध्यक्ष. ॲड शिवराज पाटील कुंद्राळकर, ॲड एस. एस. गायकवाड,. ॲड ए. एन. जोगदंड, ॲड एन.पी.हाके, ॲड.डी. जी. हाके, ॲड जी.जी.शिंदे, ॲड बी. जी.जाधव, ॲड आशिष कुलकर्णी, ॲड एच.आर.शेख, ॲड गजानन देवकत्ते, ॲड योगेश सोलनकर, ॲड सौ.भाग्यश्री कासले यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.




