क्राईम

मुखेडमध्ये चिमुरड्यांच्या हाती वह्या-पुस्तकांऐवजी ‘गांजा-गुटखा’; पोलिसांच्या डोळ्यांदेखत सुरू आहे नशेचा काळाबाजार!

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: १८ जुलै २६

 मुखेड शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि पालकांची झोप उडवणारी परिस्थिती समोर आली आहेशाळेत आणि कॉलेजमध्ये जाऊन भविष्य घडवण्याच्या वयात शहरातील अल्पवयीन मुलेमुली भयानक व्यसनांच्या विळख्यात अडकली आहेतशहरात गांजागुटखा आणि इतर अमली पदार्थांचा सुळसुळाट झाला असूनप्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे मुखेडची तरुण पिढी उघड्या डोळ्यांनी नशेच्या गर्तेतढकलली जात आहे.

राज्यात गुटखातंबाखूयांसारख्या घातक पदार्थांच्या विक्रीवर कायदेशीर बंदी आहेमात्रमुखेड शहरातया बंदीचा पुरता फज्जा उडाला आहेशहरातील चौका चौकात आणि अगदी सामान्य किराणा दुकानांवरही हे व्यसनाचे पदार्थ अत्यंत सहज उपलब्ध होत आहेतसहज उपलब्धता असल्यामुळेच शाळकरी आणि अल्पवयीन मुले या व्यसनांच्या वेगाने आहारी जात आहेत.

शहरालगत असलेले अनेक नवीन लेआऊट्स आता ‘अय्याशीचे आणि नशेचे अड्डे‘ बनले आहेतलपूनछपून नशा करण्यासाठी अल्पवयीन तरुण अंधार पडताच दुचाकीवरून या भागात भटकताना दिसतातशहरातील खालील भागात नशेबाजांचा सुळसुळाट वाढला आहे:

कौठा रोड,बागवान बिरादरी मंगल कार्यालय परिसर ,जुनी नगरपालिका ,नवीन नगरपालिकेच्या पाठी मागील रोड परिसर,चंद्रमा धाब्याच्या बाजूस असलेला सैलानी दर्गा परिसर ,पाडूर्णी रोड,लातूर रोड ईदगाह परिसर,क्रीडा संकुल परिसर,फिल्टर पाण्याची टाकी  हुतात्मा शाळा परिसर,पंचायत समिती परिसर ,मुकबघीर शाळा बाजूस मैदान मोढा रोड परिसर शहरात खुलेआम नशेचा बाजार भरलेला असताना ‘अन्न  औषध प्रशासन‘ (FDA) आणि ‘पोलीस प्रशासन‘ नेमके काय करत आहेहा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेतयाविक्रेत्यांवर कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच मोठे प्रश्नचिन्हनिर्माण झाले आहेपोलिसांच्या ‘निष्काळजीपणामुळे आणि बघ्याच्या भूमिकेमुळेच‘ नशेचे हे काळे कारनामे वाढीस लागले असल्याचा थेट आरोप जनतेतून होत आहे.

पोलिसांच्या या ढिसाळ कारभारामुळे मुखेडच्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहेपोलिसांनी या अमली पदार्थ विक्रेत्यांच्या तत्काळ मुसक्या आवळाव्यातअशी जोरदार मागणी जनतेतून केली जात आहेदुसरीकडेया भयानक वास्तवाचा सामना करण्यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्तेशिक्षकआणि पालकांनी एकत्रित येऊन पावले उचलण्याची नितांत गरज निर्माण झाली आहेशाळकरी मुलांनाया व्यसनांच्या भीषण परिणामांबद्दल जागरूक करण्यासाठी तातडीने मोहिमा राबवल्या गेल्या पाहिजेत.

पोलीस प्रशासनाने वेळीच कडक कारवाईचा बडगा उगारला नाही, तर मुखेडच्या युवा पिढीचे अतोनात नुकसान होईल आणि भविष्यात जनतेचा उद्रेक झाल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा आता जनतेतून दिला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button