शहरात उद्या मोफत आरोग्य व आयुष्यमान कार्ड नोंदणी शिबीरचे आयोजन

▫️गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे बल्खी यांचे आवाहन
मुखेड प्रतिनिधी:- दि.२२ सप्टेंबर
मुखेड : शहरातील प्रभाग क्रमांक ९ येथे मंगळवार २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजे पर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच अयुष्मान भारत कार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे, हे शिबिर जुनी नगरपालिकेच्या बाजूस, राजमाता अहिल्याबाई होळकर सभागृह समोर पार पडणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक भाई आसद इब्राहीम बल्खी व एस. के. बबलू यांनी केले.

स्व. मा. आ. भाई गणपतराव देशमुख या शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या स्मरणार्थ आयोजित या शिबिरामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार व गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करूनदेण्याचा उद्देश आहे. शिबिराचे आयोजन शेतकरी कामगार पक्ष व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम समाजसेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या शिबिरात विविध तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात येणार आहे. यात डॉ. संतोष टाकसाळे (वैद्यकीय अधीक्षक व क्षयरोग तज्ञ), डॉ. आदमपुरकर (फिजिशियन), डॉ. वर्षा कोरडे व डॉ. मांजरमकर (नेत्ररोगतज्ञ), डॉ. लक्ष्मीकांत पेंडकर(बालरोग तज्ञ), डॉ. पदमवार (दंतरोग तज्ञ), डॉ. देवकत्ते व डॉ. जबीन शेख (स्त्रीरोग तज्ञ) तसेच डॉ. मुकुल गोपुलवाड (अस्थिरोग तज्ञ) ,शंकर सोमठाणकर आयसीटीसी, बेग शोकत अली मदार अर्शक्लिनिक, शेख शहानवाज फारुक एनसीडी आदी तज्ञ उपस्थित राहून सेवा देणार आहेत. मोफत आरोग्य तपासणी बरोबरच अयुष्मान भारत कार्ड नोंदणीही करण्यात येणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे जास्तीत ज्यास्त या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.




