सामाजिक

मोटरगा येथे भारतीय बौद्ध महासभेची ग्राम शाखा स्थापन.

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड- ०४ ऑक्टोंबर २६


तालुक्यातील मोटरगा या गावी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मुखेड च्या वतीने रविवार दिनांक ०४ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्राम शाखा स्थापन करण्यात आली असून शाखा अध्यक्षपदी आकाश गायकवाड तर सरचिटणीसपदी सिद्धार्थ तुरेराव यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. तालुकाध्यक्ष अविनाश कांबळे यांनी ग्राम शाखेत काम करू इच्छिणाऱ्या पदाधिकाऱ्यास भारतीय बौद्ध महासभेचे नियम व आचारसंहिता, पदाचे कार्य याचे महत्त्व सांगितले. तसेच तालुका सरचिटणीस कुलदीप बनसोडे, संस्कार सचिव रघुनाथ जोंधळे, संरक्षण सचिव राजेश दीपके यांनी उपस्थित बौद्ध उपासकांना मातृ संस्थेविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर ग्राम शाखेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये ग्राम शाखा अध्यक्ष म्हणून आकाश गायकवाड, संस्कार उपाध्यक्ष प्रीतम गायकवाड, सरचिटणीस सिद्धार्थ तुरेराव, कोषाध्यक्षपदी बुद्धभूषण जोंधळे, हिशोब तपासणीसपदी गजानन गायकवाड, संघटकपदी यशवंत जोंधळे, शंकरराव जोंधळे, शिवाजी गायकवाड, एकनाथ गायकवाड, धोंडिबा जोंधळे तर सचिव म्हणून विजय जोंधळे, देवानंद जोंधळे, सायबु गायकवाड, तसेच सहसंघटकपदी अंकुश गायकवाड, भारत गायकवाड, प्रकाश कोळगावकर, धम्मदीप जोंधळे,भगवान जोंधळे तसेच इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रघुनाथ जोंधळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन तालुका सरचिटणीस कुलदीप बनसोडे यांनी केले. या कार्यक्रमास गावातील बौद्ध उपासकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button