सामाजिक

ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यास विलंब; महसूल सहायक व सहायक महसूल अधिकारी निलंबित

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड  :- ०९ ऑक्टोंबर २६

आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रमाणपत्र निर्गमित करण्यास विनाकारणविलंब केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कठोर कारवाई केली आहे. बिलोली तहसीलकार्यालयातील महसूल सहाय्यक सी.पी. धर्मेकर आणि सहाय्यक महसूल अधिकारी एन.व्ही. पाळेकरयांना तातडीने सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील रहिवासी कार्तिक काशिनाथ पांडे यांनी दि. 28 जून 2026 रोजीमहाऑनलाईन प्रणालीद्वारे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. मागणी केलेले प्रमाणपत्र विहितमुदतीत देणे बंधनकारक असतानाही संबंधितांकडून त्यास विलंब झाला. त्यानंतर दि. 8 सप्टेंबर 2026 रोजी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले.

प्रमाणपत्र देण्यास विनाकारण विलंब करून शासकीय कामकाजात दिरंगाई व निष्काळजीपणा केल्याचेनिदर्शनास आल्याने संबंधित महसूल सहाय्यक व सहाय्यक महसूल अधिकारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाचीकारवाई करण्यात आली आहे.

शासकीय सेवा व विविध प्रमाणपत्रांच्या कामकाजात नागरिकांना अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठीसंबंधित अधिकारी–कर्मचाऱ्यांनी विहित कालमर्यादेत कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुलकर्डिले यांनी दिले आहेत. शासकीय कामकाजात दिरंगाई अथवा निष्काळजीपणा करणाऱ्याअधिकारी–कर्मचाऱ्यांविरुद्ध यापुढेही नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्टकेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button