सामाजिक

मुखेड बसस्थानकात प्रवाशांचे हाल; भिंतीवर ‘पिण्याचे पाणी’ फक्त नावालाच!

मुखेड (प्रतिनिधी): ४ मार्च २६ 

राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना मुखेड बसस्थानकात मात्र प्रवाशांना पिण्याच्यापाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहेबसस्थानकाच्या भिंतीवर मोठ्या अक्षरात ‘पिण्याचे पाणी‘ असे फलक लावण्यात आले असलेतरी प्रत्यक्षात मात्र तिथे थेंबभरही पाणी उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

सध्या मार्च महिना सुरू असून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहेमुखेड हे तालुक्यातील मुख्य केंद्र असल्याने येथून दररोज हजारो प्रवासी वेगवेगळ्या गावांत प्रवास करतातयामध्ये वयोवृद्ध नागरिकमहिला आणि लहान मुलांची संख्या मोठी असतेमात्रबसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यानेया प्रवाशांना भर उन्हात पाण्यासाठी खासगी दुकानदारांकडे धाव घ्यावी लागत आहे.

बसस्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेले नळ आणि टाक्या कोरड्या ठाक पडल्या आहेत. ‘पिण्याचे पाणी‘ असे नाव लिहून केवळ औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहेअनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला की, “जर पाणी उपलब्ध करून देता येत नसेलतर किमान तसे फलक तरी लावूनयेतजेणेकरून प्रवाशांची दिशाभूल होणार नाही.”

बसस्थानकात तातडीने शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्याची सोय करावी.

पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेची नियमित देखभाल करण्यात यावी.

उन्हाळा संपेपर्यंत पाण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात ‘पाणपोई‘ सुरू करावी.

मुखेड आगाराच्या व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रवाशांची ही गैरसोय तात्काळ दूर करावीअन्यथा प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागेलअसे चित्र सध्या दिसत आहे.

आम्ही लांबून येतोसोबत लहान मुलं असतातबसस्थानकात आल्यावर पाणी मिळेल अशी अपेक्षाअसतेपण इथे आल्यावर नळाला पाणीच नसतेगरिबांनी प्रत्येक वेळी २० रुपयांची पाण्याची बाटलीकशी विकत घ्यायची?” 
प्रवाशांची प्रतिक्रिया 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button