दुबईत अडकलेल्या मुखेडच्या नागरिकांची माहिती द्या; तहसीलदार राजेश जाधव यांचे आवाहन

मुखेड (श्रमिक एकता न्यूज): दि ०२ मार्च २६
कामानिमित्त किंवा अन्य कारणास्तव संयुक्त अरब अमिराती (दुबई) येथे गेलेले मुखेड तालुक्यातील नागरिक जर सद्यस्थितीत तिथे अडकून पडले असतील, तर त्यांची माहिती तातडीने प्रशासनाकडे सादर करण्याचे आवाहन मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांनी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाने एका विशिष्ट गुगल शीटचा (Google Sheet) फॉरमॅट उपलब्ध करून दिला आहे.
मुखेड तालुक्यातील संबंधित नागरिक किंवा त्यांच्या नातेवाईकांनी या फॉरमॅटमध्ये आपली पूर्ण माहितीभरणे आवश्यक आहे ते खाली लिंक दिलेली आहे .
उद्या दि ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतची मुदत जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राने (District Emergency Operation Centre) ही माहिती अत्यंत तातडीने मागविली आहे. अडकलेल्या नागरिकांची नावे आणि इतर तपशील उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्हा आपत्कालीन केंद्रास कळवण्याचे निर्देश तहसीलदार राजेश जाधव यांनी दिले आहेत.
परदेशात अडकलेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठीही माहिती संकलित केली जात आहे. मुखेड तालुक्यातील ज्या नागरिकांचे नातेवाईक सध्या दुबईत आहेत, त्यांनी ही माहिती विहित वेळेत प्रशासनाकडे पोहोचवावी, जेणेकरून पुढील कार्यवाही करणे सोपे होईल, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे


