समता नगर–अशोक नगर येथे १३५ व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी भीमा युवा एल्गार मंडळाची कार्यकारिणी जाहीर

▫️अध्यक्षपदी गोरूपाशा शेख तर सचिवपदी वैभव शिरसे यांची निवड
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता ०५ मार्च २६
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त समता नगर व अशोक नगर परिसरात दर वर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात जयंती साजरी करण्यासाठी भीमा युवा एल्गार जयंती मंडळ २०२६ ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी गोरूपाशा मौलासाब शेख यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी सारिपुत्र नागोराव भोसले व सम्यक अशोक बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच सचिवपदी वैभव उत्तमराव शिरसे, सहसचिवपदी साहिल संजय कांबळे व प्रज्ञावंत गोडबोले यांचीनिवड झाली आहे. कोषाध्यक्षपदी वैभव उत्तमराव सोनकांबळे यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
याशिवाय समता नगर व अशोक नगर परिसरातील विविध समाज बांधवांचा सदस्य म्हणून मंडळात समावेश करण्यात आला आहे. या मंडळाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचाप्रसार करणे, सामाजिक ऐक्य वाढवणे आणि जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणे हा उद्देशअसल्याचे नगरसेवक हेमंत घाटे यांनी सांगितले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंतीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजनकरण्यात येणार असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
या वेळी नगरसेवक हेमंत घाटे,नवनिर्वाचित जयंती अध्यक्ष गोरूपाशा मौलासाब शेख ,कॉम्रेड विजय लोहबंदे,किरण मोरे,चिंटू कांबळे आदि उपस्थित होते



