सामाजिक

प्रभाग क्र.९ मध्ये नाल्या तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर; नगरसेवकांसह पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा फज्जा

मुखेड प्रतिनिधी:- ६  मार्च २६ 

शहरातील प्रभाग क्रमांक  मध्ये स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला असूनयेथील माजी नगराध्यक्ष कामजे यांच्या घराशेजारील मुख्य नाली कचऱ्याने पूर्णपणे तुंबली आहेयामुळे नालीतील दुर्गंधीयुक्त काळे पाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात नरकयातना सोसाव्या लागत आहेतविशेष म्हणजेया गंभीर समस्येकडे स्थानिक नगरसेवक आणि नगर पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या भागातील नाल्यांची साफसफाई झालेली नाहीमाजी नगराध्यक्ष कामजेयांच्या घराच्या बाजूला असलेल्या नालीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिककचरा आणि गाळ साचल्याने पाण्याचा निचरा होणे बंद झाले आहेआज मार्च रोजी परिस्थिती अधिकच बिकट झाली असूनसांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे.

रस्त्यावर साचलेल्या या घाण पाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांना घरात राहणे कठीण झाले आहे.

डासांचे प्रमाण वाढल्याने डेंग्यूमलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

या रस्त्यावरून येजा करणाऱ्या पादचाऱ्यांनाविशेषतः शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना घाणपाण्यातून वाट काढावी लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगर पालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही पावलेउचललेली नाहीत. “एककीडे शहर स्वच्छतेच्या गप्पा मारल्या जातात आणि दुसरीकडे प्रत्यक्ष वॉर्डातसांडपाणी रस्त्यावर वाहत आहेलोकप्रतिनिधींना मतदारांच्या त्रासाचे काहीच देणेघेणे राहिलेले नाहीका?” असा संतप्त सवाल रहिवाशांनी विचारला आहे.

प्रभाग क्र.९ मधील हे चित्र पाहता नगर पालिका आणि लोकप्रतिनिधी कुंभकर्णी झोपेत आहेत की कायअशी उपरोधिक चर्चा परिसरात रंगली आहेआता तरी प्रशासनाला जाग येईल का आणि ही नाली साफकेली जाईल कायाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button