केवायसी करूनही मिळेना ‘लाडक्या बहिणींना’ दरमहा अनुदान; मुखेडमध्ये महिलांची नाराजी

मुखेड प्रतिनिधी:-( श्रमिक एकता न्यूज़ ) मार्च २६
शासनाच्या ‘लाडक्या बहिणी’ योजनेअंतर्गत दरमहा मिळणारे अनुदान केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही अनेक महिलांच्या खात्यात जमा होत नसल्याची तक्रार समोर आली आहे. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुखेड तालुक्यातील काही महिलांनी अंगणवाडी केंद्रांवर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून दिले होते. तसेच बँकेत जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अनेक महिने उलटूनही त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही.
महिलांचे म्हणणे आहे की, सर्व कागदपत्रे वेळेत सादर करूनही अनुदान न मिळाल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. काहींना अर्ज मंजूर झाला की नाही, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्याचीतक्रार आहे.
दरम्यान, संबंधित विभागाकडून तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्र पडताळणी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाने लवकरात लवकर प्रकरणांची चौकशी करून पात्र लाभार्थींना अनुदान वितरित करावे, अशी मागणी महिलांकडून होत आहे.
सदर फोटो ही कॉम्प्युटर द्वारे बनवलेली आहे.



