क्राईम

मुखेडकरांमध्ये भीतीचे वातावरण; दिवसाढवळ्या घरफोडी करून चोरटे पसार.

मुखेड प्रतिनिधी: ( श्रमिक एकता न्यूज़) ०७ मार्च २६ 

शहरातील शारदानगर भागात गुरुवारी भरदिवसा घरफोडीची खळबळजनक घटना घडलीचोरट्यांनी बंदघराचे कुलूप तोडून घरातील रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने असा एकूण ५० हजारांहून अधिकचा ऐवज लंपास केला आहेदिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले असून शहरात सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे..

फोटोग्राफर  व्यापारी असलेले ज्ञानेश्वर पडलवार हे गुरुवारी घरातून दुकानासाठी मुखेड येथे गेलेदुपारी१२ वाजेदरम्यान त्यांची पत्नी बाहेर गावाहून घरी परतल्या असता घराचा लाकडी दरवाजा तुटलेल्या अवस्थेत आढळला

त्यांनी पतीला फोन करून बोलावले  पाहणी केली असता कपाटाचे दार तोडून नगदी ५५ हजार रुपये ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्णफुले  अंदाजे एक तोळा चांदी असा ५० हजार रुपयांचा ऐवज चोरूननेल्याचे निदर्शनास आलेघटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे यांनी नांदेड येथून श्वानपथक पाचारण केलेश्वानपथक प्रमुख महमंद आयुब  दत्ता गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी केलीयाप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

बातमी साठी वापरलेल्या या फोटोचा आणि या घटनेचा काहीही संबंध नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button