लातूरच्या बालकलाकाराची किमया; सहावीच्या सलमान शेखने साकारले छत्रपती शिवरायांचे विलोभनीय चित्र

मुखेड प्रतिनिधी:- ९ मार्च २६
लातूर येथील ज्ञानेश्वर विद्यालयाचा इयत्ता सहावीत शिकणारा विद्यार्थी सलमान शेख याने आपल्याकुंचल्याच्या जादूने शिवरायांचे एक अप्रतिम रूप कागदावर उतरवले आहे. केवळ कलर पेन्सिलचा वापरकरून त्याने रेखाटलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र सध्या सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतअसून, त्याच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सलमानने अत्यंत सूक्ष्म तपशीलांसह हे चित्र साकारले आहे. महाराजांच्या चेहऱ्यावरील तेज, करारी नजरआणि कपाळावरचा टिळा या गोष्टी त्याने कलर पेन्सिलच्या माध्यमातून अत्यंत जिवंतपणे मांडल्या आहेत. वयाच्या मानाने सलमानची ही कलाकृती त्याच्यातील उपजत प्रतिभा आणि मेहनतीची साक्ष देते.
कोणत्याही कलेला योग्य वळण मिळण्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. सलमानला त्याच्या शाळेतील कला शिक्षक ज्ञानेश्वरजी बेंबडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. बेंबडे सरांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच सलमानने हे आव्हानात्मक चित्र पूर्ण केले आहे. विद्यार्थ्याच्या यशात शिक्षकाचा वाटाकिती महत्त्वाचा असतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

सलमानच्या या कलेची दखल शाळेच्या मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक आणि पालकांनी घेतली आहे. “एका छोट्या वयोगटातील मुलाने इतक्या सफाईदारपणे रेखाटलेले हे चित्र थक्क करणारे आहे,” अशाशब्दांत अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.
“सलमानच्या या यशामुळे ज्ञानेश्वर विद्यालयाचे नाव उंचावले आहे. भविष्यात तो एक मोठा चित्रकार व्हावा, हीच सदिच्छा!”
सलमान शेख आणि त्याचे मार्गदर्शक ज्ञानेश्वरजी बेंबडे यांचे या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
संपादक :- भाई आसद इब्राहिम बल्खी




